लखमापूर-कादवा कारखाना रस्त्याचा खेळखंडोबा

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा ते कादवा सहकारी साखर कारखाना या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, खड्ड्यांत रस्ता की रस्त्यात खड्डे?असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्वरित या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
लखमापूर फाटा वरखेडा बोपेगाव खेडगाव फाटा- कारखाना या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे.दररोज हजारो कामगार,शेतकरी,विद्यार्थी आणि वाहनचालकांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता कादवा साखर कारखाना मार्ग, पिंपळगाव भाजीपाला मार्केटला जाण्या-येण्याचा प्रमुख मार्ग असल्याने शेतकऱ्यांची

 ट्रॅक्टर,पिकअप व शालेय विद्याथ्यांची स्कूल बस आर्दीसह खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणात बर्दळ असते. मात्र सत्याच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे छोटे-मोठे अपघात घडत आहे.यापूर्वी अनेक वाहनधारकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. खड्यामुळे पुन्हा

एकदा एखादा मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.गेल्या एक वर्षापूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, दर्जाहीन कामामुळे 'जैसे थे' अवस्था झाली असून, या मार्गावर अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे.

 लोकप्रतिनिधींना रस्त्याच्या दुरवस्थेबाचत तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. खराब रस्त्यामुळे प्रवासी बगौना शारिरीक आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच वाहनाचे पाटे तुटणे, पलटी होणे, पंक्चर होगे आदी समस्यांनी वाहनधारक त्रस्त झाले आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभाग, लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देवून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी वाहनधारकांनी व ग्रामस्थांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!