रिपाई नेते सुधाकर रोहम यांची मागणी
दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर रोहम यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे केली आहे.
सुधाकर रोहम यांनी निवेदनात म्हटले आहे की अहिल्यानगर मधील शेतकरी वर्ग बळीराजा आधीच कर्जांनी त्रस्त झाला आहे त्यातच त्यांना कर्ज काढून उभे केलेल्या पिकाला बळीराजाला निसर्ग साथ देत नसून सध्याच्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी एप्रिल मे
महिन्यामध्ये जिल्हा सहकारी बँक अहमदनगर राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून पीक कर्ज घेऊन खरीप हंगाम मधील बाजरी सोयाबीन कडधान्य कपाशी मका यासारखे महत्त्वाचे पिके येथील शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिके उभे केले आहे तीन महिने झाले आता
बाजरी सोयाबीन मका मठ मूग काढण्याचे दिवस आले परंतु सततच्या पावसाने उभी असलेले पिके व खाली कापलेले जमिनीत झोपलेले बाजरी सोयाबीन कापूस सडून चालला आहे बाजरी व सोयाबीन पूर्णपणे काळी पडली आहे व त्याला मोड फुटले आहे त्यामुळे हा हंगाम पूर्णपणे वाया गेला
असून येथील बळीराजा शेतकऱ्यांच्या पूर्णपणे निराशा झाली असून येथील परिसरामध्ये व अहिल्यानगर जिल्ह्यात तसेच संगमनेर तालुक्यामध्ये धांदरफळ येथे शेतकऱ्याच्या सहा गाई दाखवल्या आहेत त्या गाईंना प्रत्येकी ६० हजार रुपये शासनाने विना शर्त अटींनी द्यावेत.
तसेच संगमनेर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून येथील शेतकरी बळीराजाला हेक्टरी एक लाख रुपयाची सरसकट मदत करावी महसूल विभागाने व मंत्रिमहोदयाने पंचनामेची अट घालू नये.
सरसकट जिल्हाधिकारी तहसीलदार यांना आदेश देऊन शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यावर हेक्टरी एक लाख रुपये वर्ग करावेत अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख सुधाकर रोहम सरचिटणीस तुकाराम जाधव जिल्हा उपाध्यक्ष अशोक गायकवाड
संगमनेर तालुकाप्रमुख बाळासाहेब मोकळ सरचिटणीस जालिंदर बोरुडे श्री.गायकवाड विजय आडांगळे सोमनाथ खरात गायकवाड वसंत खरात भास्कर भालेराव शरद कदम रामदास भालेराव भारत गायकवाड विश्वास मुन्तोडे अधिक कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे मागणी सरकारकडे केली आहे.
सरकारने त्याची दखल घेऊन तात्काळ मागणी मंजूर करावी अन्यथा रिपब्लिकन पक्ष येत्या काही दिवसात सरकार विरोधी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जिल्हाधिकारी कार्यालय सह तहसील कार्यालय वर शेतकरी मोर्चा काढले जाईल असा इशारा येथील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी दिला आहे.
