कमांडर देवेंद्र औताडे यांचा श्रीरामपूर सकल जैन समाजाच्या वतीने सन्मान

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम ऑपरेशन सिंदूर मध्ये शौर्य गाजवणारे तालुक्याचे भूमिपुत्र विंग कमांडर देवेंद्र औताडे यांचा सकल जैन समाज श्रीरामपूरच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला.
भाजप जैन प्रकोष्ठ श्रीरामपूरचे संयोजक संजय कासलीवाल, पत्रकार रमेश कोठारी पत्रकार अनिल पांडे यांच्या पुढाकाराने हा सोहळा पार पाडला.

 यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी यांनी देवेंद्र औताडे यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन देशासाठी बलिदान देण्यास ही मागे पुढे पाहिले नाही यांनी केलेल्या कार्याचा भारत सरकारने दखल घेऊन त्यांना वायू सेना शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले याबद्दल सकल जैन समाज श्रीरामपूरच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

संजय कासलीवाल यांनी सांगितले देवेंद्र औताडे यांनी भारत मातेचे रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली व यांचे मुळे आपण सुरक्षित आहोत यांचे हातून अशीच देश सेवा घडो या साठी शुभेच्या दिल्या.

देवेंद्र औताडे आपल्या सत्कारास उत्तर देताना म्हटले की हल्ला करतांना परत येण्याची शक्यता खूप कमी होती, कुटुंबाशी संपर्क सुद्धा होत नव्हता म्हणून कुटुंबासाठी एका कागदावर संदेश लिहून ठेवला होता ,६८ तास कोणत्याही प्रकारची विश्रांती न घेता देशाचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडत होतो, 

आपल्या सन्मानाने मी फार प्रभावित झालो आहे मला प्रोत्सान मिळाले आहे या वेळी आचार्य सुयश गुप्तजी महाराज यांनी व्हिडिओ कॉल द्वारे आशीर्वाद दिले या वेळी पत्रकार अनिल पाडे व दैनिक जय बाबा वृत्तपत्राचे मनोज आगे यांची शुभेच्या पर भाषणे झाली आभार राजेंद्र पाटणी यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ. जयप्रकाश गंगवाल,अँड सुहास चुडीवाल,मुकेश कोठारी, विजय झांझरी, महावीर पाटणी,सचिन कोठारी, मनोज काला, प्रकाश पांडे, जितेंद्र कासलीवाल, राहुल सोनी, मनोज ठोले,पारस पाटणी, संदीप छाजेड ,सुमित पांडे, अमित कोठारी, महावीर कोठारी, राजकुमार काला मयूर पाटणीआदि मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!