अहिल्यानगर संजय गायकवाड महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन ट्रस्ट,एस.एन.जी. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च,राजगुरुनगर, पुणे या संस्थेत *सहाय्यक प्राध्यापक* पदावर कार्यरत असलेले सचिन सुरेश बिडवे यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेतर्फे त्यांना नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.त्यांनी आयबीएमआरडी, विळद,अहिल्यानगर येथून संशोधन पूर्ण केले.
“ प्रोस्पेक्ट्स अँड प्रॉब्लेम्स व्हाइल इन्व्हेस्टिंग इन न्यू फायनान्शियल प्रॉडक्ट्स: स्टडी विथ स्पेशल रेफरन्स टू इंडिव्हिज्युअल इन्वेस्टर इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट” या महत्वाच्या विषयावर त्यांनी सखोल अभ्यास करून प्रबंध सादर केला. १५ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या परीक्षेत डॉ. आशुतोष कोलते यांनी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून तर डॉ.गजानन मुधोळकर ( नांदेड विद्यापीठ) यांनी बाह्य परिक्षक म्हणून कामकाज पाहिले.
या संशोधन प्रवासात त्यांना डॉ. सुदर्शन गिरमकर (संचालक, परिक्रमा महाविद्यालय व्यवस्थापन विभाग), डॉ. संजय धर्माधिकारी (संचालक, आयबीएमआरडी महाविद्यालय व्यवस्थापन विभाग),डॉ. राजेंद्रसिंह परदेशी, डॉ. मेघा जैन यांचे थेट मार्गदर्शन लाभले.
प्रा.सचिन बिडवे हे गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक संस्थेत कार्यरत असून त्यांचे शिक्षण संगमनेर येथे झालेले आहे.ते प्रवरा शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक सुरेश बिडवे आणि सौ.लता बिडवे यांचे चिरंजीव आहेत.त्यांच्या यशस्वीतेत पत्नी सौ.तृप्ती बिडवे,कन्या कुमारी आस्था बिडवे आणि समस्त बिडवे परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ.सुजय विखे पा. यांनी विखे पाटील प्रतिष्ठानतर्फ. सचिन बिडवे यांचा सत्कार केला. त्याचबरोबर समस्त उंबरी बाळापुर ग्रामस्थ व मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले.
