मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याच्या संगमनेरात जल्लोष

Cityline Media
0
संगमनेर (प्रतिनिधी) मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा ऐतिहासिक आनंद संगमनेर शहर व तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आला.मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अखंड संघर्षाला अखेर यश मिळाल्याने समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सकल मराठा समाज,संगमनेर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी परिसर “जय जिजाऊ”, “जय शिवराय”, “एक मराठा लाख मराठा”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी दणाणून गेला.

मराठा क्रांती चौक येथे फटाके वाजवून व एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला.फटाक्यांची आकाशबाजी करत जल्लोष करण्यात आला. मुंबई येथे सुरू असलेल्या आरक्षणास संगमनेर येथून मोठ्या प्रमाणामध्ये अन्नपदार्थ सुका किराणा एक हजार पॅकिंग पाणी बॉटल असे दोन हायवा व एक ट्रक भरून साहित्य पाठवण्यात आले होते. या कार्यक्रमाला समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 
यावेळी राष्ट्रीय क्रिकेट संघात सिद्धेश गणेश हासे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला. 

मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीला मिळालेले यश हे ऐतिहासिक असून,यामुळे समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी नवीन दारे खुली होतील,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!