नाशिक दिनकर गायकवाड इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणारी ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक यंदा ५ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे. यावर्षी ईद-ए-मिलादुन्नबीचे १५०० वे वर्ष असल्याने मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणावर सजावट करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
छायाचित्र-अजित अशोक ब्राह्मणे
शहरातील सर्व मशिदी, दर्गाह, विविध दुकाने, अनेक निवासस्थाने यांच्यासह अनेक रस्ते,गल्लीबोळ तसेच चौका चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा हिरवे, लाल,सफेद रंगाचे इस्लामी मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात आली आहे.नौजवानाने इगतपुरीवालाचाळ मंडळाकडून ही सजावट करण्यात आली आहे.याशिवाय
फाळके रोड फ्रेंड्स सर्कल तर्फे संपूर्ण फाळके रोड परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
रस्त्याच्या मध्यभागी शुभेच्छा देणारी अनेक फलके उभारण्यात आल्याने येथील सजावटीत अधिक
भर पडली आहे.दरम्यान मदिना चौक,मुंबई नाका जवळील दर्गाह परिसर रोड,वडाळा रोड भागातील
मोहम्मद अली रोड, पखाल रोड,अशोका मार्ग, जलसा हॉल परिसर,सरगम सोसायटी परिसर, चौक
मंडई,बागवानपुरा, कोकणीपुरा,फुले मार्केट परिसर, पिंजार घाट,मुलतानपुरा, काजीपुरा,आदम नंशाह चौक, जोगवाडा, खडकाळी आदी ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
