सर्पमित्र शिवाप्रसाद पवार केले अजगराला निसर्गात मुक्त
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील वरंवडी शिवारातील थांपलिगं घाटालगत सोमवारी रात्री ५ फूट लांबी व ६ किलो वजन असलेला अजगर आढळला असून सर्पमित्र शिवप्रसाद पवार याने या अजगराला निसर्गात मुक्त केले आहे. तर परिसरात अजगर आढळल्याची ही दुसरी घटना असल्याचे अनेकानी सागितले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,सोमवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास मच्छींद्र यरमल हे वरंवडी शिवारातील थांपलिगं घाटाच्या पायथ्याशी वस्तीत राहातात वस्ती लगत देवाला दिवा लावण्यासाठी जात असताना एक मोठा साप झाडाच्या पोखरलेल्या खोडात दिसला.त्यामुळे परिसरातील नागरीकाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे ओळखून यरमल यानी स्थानिक नागरीकाना याबाबत माहिती देऊन सर्पमित्र शिवाप्रसाद पवार याला संपर्क केला.
रात्र झाली असतानाही घटनेचे गांभीर्य ओळखत सर्पमित्र शिवाप्रसाद पवार हे घटनास्थळी दाखल झाले.थोड्या वेळातचं मोठ्या शिताफीने या सापाला ताब्यात घेऊन हा अजगर असल्याची माहिती उपस्थिताना दिली.सर्पमित्र शिवाप्रसाद पवार व मच्छींद्र यरमल यांनी त्याला निसर्गात मुक्त केले
-थापलिंग घाटात जंगल समाधानकारक; नागरिकांनी काळजी घ्यावी.
दोन वर्षापूर्वी याच ठिकाणी ९ फुट लांबीचा अजगर आढळला होता लपण क्षेत्र पुरक अन्न भेटत असल्याने या परिससरात अजगरांची संख्या वाढत असल्याचे वन्यप्रेमी सांगतात.
