साकुर पठारातील गावांमध्ये ४ कोटी ६८ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ
संगमनेर संपत भोसले संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागात परिवर्तन होणे बाकी आहे आणि ते परिवर्तन आम्ही विकास कामांच्या माध्यमातून करणार आहे पहिल्या टप्प्या मध्ये या साकुर पठार भागासाठी जवळ जवळ ४ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी दिला आहे या पुढील दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात सुद्धा भरघोस निधी दिला जाईल आणि अनेक वरील वर्षापासून जाणून मधून प्रलंबित ठेवलेला साकुर पठार भागाचा पाणी प्रश्न सोडविण्याबाबतचा य सर्वे जलसंपदा विभागाच्या वतीने केला आहे या साकूर पठार भागाला पाणी देणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी जांबुत येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
संगमनेर तालुक्याच्या साकुर पठार भागातील हिवरगाव पठारातर्गत येणाऱ्या पायरवाडी गिरेवाडी सुतारवाडी शेंडेवाडी अंतर्गत येणाऱ्या सतीचीवाडी व दारसोंड वाडी कर्जुले पठारतर्गत येणाऱ्या गुंजाळ वाडी पठार मांडवे येथील वाडेकर वस्ती शिंदोडी बिरेवाडी आणि जांबुत या भागातील रस्ते मजबुतीकरण काँक्रिटी करण पेव्हिंग ब्लॉक शाळा खोली व खुली व्यायामशाळा या सर्व विकास कामांचा शुभारंभ व भूमिपूजन करण्या साठी आमदार खाताळ साकुर पठार भागात आले होते त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या वेळी या पठार भागातील वाडी वस्तीवर आलो होतो निवडून आल्यानंतर विकास कामे घेऊनच गावागावातील जनतेचे आभार मानू असा निर्धार केला होता त्यानुसार निधी मिळविण्यासाठी शासन दरबारी आपण पाठपुरावा केला आणि निधी मिळाला या निधीच्या माध्यमातून काही विकास कामांचे लोकार्पण व गाईंचा शुभारंभ करायचा होत तो केला आहे आणि या साखर पठार भागात आम्ही विकास कामांच्या माध्यमातूनच परिवर्तन करून दाखवू असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तत्कालीन लोकप्रतिनिधी म्हणतात की आम्ही तालुका दुष्काळमुक्त केला यावर विचारले असता आमदार खताळ म्हणाले की मागील पाच वर्षात किती टँकर चालू होते आणि ते कशासाठी चालू होते याचा उलगडा त्यांनी जनतेसमोर करावा असा ही प्रति टोला त्यांनी दिला.
पत्रकारांवरील हल्ला निषेधार्थ
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला झाला ही निश्चितच दुर्दैवी घटना आहे परंतु पत्रकार काय कोणावरही हल्ला होणे ही चुकीचे आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्या ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे
घरी बसलेल्या माजी आमदाराने इतरांना अक्कल शिकवू नये
संगमनेरचे लोकप्रतिनिधी दुसऱ्याच्या इशारावर काम करतात अशी टीका मा.लोकप्रतिनिधींनी केली आहे यावर विचारले असता आमदार खताळ म्हणाले की काहींना पराभव झाल्यानंतर काही काम राहिले नसल्यामुळे ते आता दुसऱ्यांना अक्कल शिकवत आहेत.
एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने तुमचा पराभव केला आहे तो प्रथमतःमान्य करा आणि मगच माझ्यावर टीका करा आणि मला सल्ले द्या असा टोला आमदार खताळ यांनी माजी लोकप्रतिनिधीला लगावला मायबाप जनतेने मला सल्ला दिला तर त्याचे मी निश्चितच स्वागत करेल परंतु गेली चाळीस वर्षापासून विविध मंत्रिपदे भोगून सुद्धा तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला मूलभूत सुविधांपासून जाणून बुजून वंचित ठेवले असा नाकर्तेपणा करणाऱ्यांनी मला सल्ला देऊ नये तुमच्या सल्ल्याची मला गरज नाही अशी टिका आमदार खताळ यांनी केली जे कोणी महायुतीमध्ये येत आहे त्यांच्या मी निश्चितच स्वागत करत आहे परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची उमेदवारी मिळावी यासाठी जर ते महायुतीत येत असेल तर त्यांनी दिल्या घरी सुखी राहावे असाही सल्ला आमदार खताळ यांनी दिला.
तुमच्या व्यासपीठावर आता काँग्रेसचे लोक दिसू लागले आहे यावर विचारले असता आमदार खताळ म्हणाले की केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार आहे आम्ही विकासाचा मंत्र घेऊन पुढे चालत राहिलो आहे परंतु हिवरगाव पठार येथील सूर्यवंशी हे गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते होते परंतु कुठलाही फायदा झाला नाही मात्र तुमची माझी ओळख नसतानाही तुम्ही माझ्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला दहा लाख रुपयांचा निधी दिला आहे याचा त्यांना कुठे कुठेतरी आनंद झाला आहे मी आमदार झाल्यापासून अवघ्या आठच महिन्यात या पठार भागात निधी आणून विकास कामे करू शकलो याची मला समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच नुसत्या लढणार नाही तर जिंकण्यासाठी लढणार आहे त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. व आम्ही एकत्रित बसून जो कोणी उमेदवार देईल त्याच्या पाठीमागे माहितीचे कार्यकर्ते भक्कम उभे राहणार आहे.
असा विश्वास दिला आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निश्चितच महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या समवेत भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले खांबा गावचे सरपंच रवी दातीर भाजपचे रौफ़ शेख बुवाजी खेमनर इसाक पटेल सुभाष पेंडभाजे रवींद्र दातीर सुभाष भुजबळ अमृता कोळपकर अमित धुळगंड संदीप खिलारी रवींद्र भोर किरण भागवत मारुती आगलावे हिवरगाव पठार उपसरपंच गजानन खाडे बाळासाहेब वनवे राजू गोसावी संतोष वनवे वनवे पांडुरंग शेटे रावसाहेब गागरे सुरेश भागवत बाळसाहेब झिटे यांच्यासह साकुर पठार भागातील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते..
