अहिल्यानगर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ खेळीमेळीच्या वातावरणात

Cityline Media
0
अहिल्यानगर प्नतिनिधी पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा - २०२५ शहरात नुकतेच आयोजीत केल्या होत्या त्यात पोलीस मुख्यालय नगर शहर विभाग,श्रीरामपुर,कर्जत, शेवगाव शिर्डी व संगमनेर अशा विभागांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत कबड्डी,खोखो,हॅण्डबॉल, फुटबॉल,बास्केटबॉल, व्हॉलीबॉल,कुस्ती,बॉक्सींग,ज्यु डो तसेच मैदानी स्पर्धा अशा विविध प्रकारच्या खेळांचे उत्तम आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धे मध्ये खेळाडुंनी अत्यंत हिरीरीने भाग घेतला.

जिल्हाधिकारी.डॉ.पंकज आशिया (भा.पो.से)पोलीस अधीक्षक व सोमनाथ घार्गे यांचे उपस्थितीत या क्रीडा स्पर्धेचा समारोप झाला क्रीडा स्पर्धेत पोलीस मुख्यालय विभागाने सर्व साधारण विजेते पद पटकावले.
प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी खेळाडुंना मार्गदर्शन केले.तर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आगामी नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रिडास्पर्धे मध्ये अहिल्यानगर जिल्हयातील पोलीस खेळाडु विशेष पदके पटकावुन आपल्या जिल्हा पोलीस दलाचे नावलौकीक करतील असे प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले.

समारोप समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व पोलीस अधिकारी,खेळाडु पोलीस अंमलदार व अहिल्यानगर शहरातील प्रतिष्ठीत मान्यवर,पत्रकार बंधु,प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनीधी,पंच क्रीडा मार्गदर्शक यांचे देखील अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे आभार मानण्यात आले,

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!