अफगाणिस्तान मधील भुंकपाचा दिल्लीसह पाकिस्तानला हादरा

Cityline Media
0
नवी दिल्ली सिटीलाईन मिडिया नेटवर्क अफगाणिस्तानला काल मध्यरात्री उशिरा ६.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला.यामुळे भारतासह पाकिस्तानलाही मोठ्या प्रमाणावर हादरे बसले.यात अफगाणिस्तान भूकंपाचा केंद्रबिंदू असून, तेथील सुमारे २५० नागरिकांचा मृत्यू झाला असून, ५०० जण जखमी असल्याचे समजते.
अमेरिकी भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानच्या सीमेजवळ पूर्व अफगाणिस्तानच्या भागाला भूकंपाचे झटके बसले. यूएसजीएसनुसार भूकंपाचे केंद्र नांगहार प्रांतात जलालाबादच्या जवळ आहे. या भूकंपामुळे अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी व वित्तहानी झाली आहे. नांगहार प्रांतात सुमारे २५० नागरिकांचा मृत्यू झाला असून ५०० पेक्षा जास्त नागगिरक जखमी झाले आहेत.या भूकंपाच्या धक्क्याने अनेक घरे ढिगाऱ्यांमध्ये बदलली.

अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भूकंपाची तीव्रता इतकी होती की, भारताच्या काही भागात दिल्ली-एनसीआरपर्यंत त्याचे धक्के जाणवले. त्याशिवाय पाकिस्तानातही काही भागात भूकंपाचे झटके बसले. नांगहार प्रांतातच २० मिनिटानंतर दुसरा भूकंप आला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ होती. खोली १० किलोमीटर होती. रविवारी स्थानिक

वेळेनुसार हा भूकंप ११.४७वाजता झाला.

अफगाणिस्तानात मागच्या महिन्याभरात भूकंप होण्याची ही पाचवी वेळ आहे. भूकंपाच्या दृष्टीने हा संवेदनशील भाग आहे. दि. २७ऑगस्ट रोजी ५.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा, दि. १७ ऑगस्ट रोजी ४.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता.रिक्टर स्केलवर भूकंप १ ते ९ च्या आधारावर मोजला जातो. भूकंपाच्यावेळी पृथ्वीच्या पोटातून

याआधी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी अफगाणिस्तानात ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. तालिबान सरकारच्या अंदाजानुसार त्यावेळी ४००० नागरिकांचा मृत्यू झाला होता. सयुंक्त राष्ट्राने मृताचा आकडा कमी जवळपास १५०० सांगितला होता.

तप्त ऊर्जा बाहेर निघते.रेड क्रॉसनुसार, अफगाणिस्तानातील हिंदूकुश पर्वत रांगांचा भाग भूवैज्ञानिक दृष्टीने खूप सक्रीय आहे. तिथे दरवर्षी भूकंप येत असतात. हा भाग भारतीय आणि यूरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सवर आहे. एक फॉल्ट लाइन थेट हेरातमधून जाते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!