डॉ.सुजय विखे पा.यांची झरेकाठीत जाहीर गर्जना
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे जनसेवा युवा मंच या संघटनेचे नुकतेच डॉ.सुजय विखे यांच्या हस्ते उद्धघाटन झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील जेष्ठ माजी सैनिक मच्छींद्र वाणी हे होते.
प्रसंगी डॉ.सुजय विखे म्हणाले की "लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी प्रत्येक जण म्हणत होता विखे परिवार संपवायचा,आता ही शेवटची निवडणूक,यापुढे विखे पाटलांची राजकारणातली पाळेमुळे उपटली जातील.पण आज नेमकं उलटं झालं आहे. आश्वासनं देण्याचा काळ संपला.आश्वासनं देऊन लोकांना फसवणारे संपले. गोरगरीब जनतेनं दाखवून दिलं की सत्ता आणि ताकद राजकीय घराण्यांच्या हाती नाही, तर सर्वसामान्यांच्या हातात आहे. कोणी विचार केला होता का – एक सर्वसामान्य अमोल खताळ आमदार होईल? पण जनता ठरवलं आणि दाखवून दिलं!"
सुजय विखे पुढे म्हणाले, "नवं संघटन उभं करताना जुन्यांनी दिलेल्या योगदानाचा विसर पडता कामा नये.धांदरफळ प्रकरणानंतर दंगल झाली,प्रचंड प्रचार झाला,तरी संगमनेरकरांनी मला आमदार करायचं ठरवलं होतं मात्र आम्ही ठरवलं सुजय विखे आमदार न झालं तरी चालेल,पण अमोल खताळला आमदार करू! हा आमचा मनाचा मोठेपणा आहे.पदाची अपेक्षा नाही.एवढ्या रात्री, एवढ्या मोठ्या संख्येने लोक एका माजी खासदाराच्या सभेला येतात म्हणजे पद नव्हे,तर माणूस महत्त्वाचा आहे हे अधोरेखित होतं.पद गेलं तरी किंमत टिकून राहिली पाहिजे आणि आम्ही ते करून दाखवलं आहे."
“खासदारकी गेली,पण आम्ही खचून बसलो नाही.ताकतीने उभे राहिलो.गावोगावी फिरलो. ४० वर्षं संगमनेर तालुक्यातील जनतेनं विखे परिवारावर प्रेम केलं आहे नगर दक्षिणेत लाटेमुळे कुणीतरी खासदार झाला,पण आज त्याची दखल कोण घेतंय? शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी संसद बंद पाडू म्हणणाऱ्यांना आज संसदेत दोन मिनिटंही बोलू दिलं जात नाही.ही त्या खासदाराची अवस्था आहे," असा टोला त्यांनी निलेश लंके यांचं नाव न घेता लगावला.
सभेला भाजपा युवा मंचाचे सोमनाथ डोळे,गंगाधर व्यवहारे, डॉ.रमेश वाणी, प्रा. वनिता नाईकवाडी, स्वप्निल पाटील, राहुल वाणी, जालिंदर वाणी, राजेंद्र वाणी,अनिल बर्डे, मदन म्हंकाळे,मंगेश व्यवहारे, जालिंदर वाणी, जयदीप तोंडे, महेश भवर, विजय वाणी, तुषार वाणी , संजय वाणी,अनिल वाणी, वाल्मीक शिंदे,अभिनव वाणी, विकास वाणी,गंगाधर वाणी,भीमराज हारदे,विजय म्हसे, सतीश जोशी, भारत गीते, प्रा. कान्हु गीते, शरद ढमक, अशोक जोशी किशोर वाघमारे यांच्यासह कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन सचिन आव्हाड यांनी केले.
मराठा आरक्षणाचा निर्णायक क्षण ज्या मराठा आरक्षणावरून माझं खासदारपद गमावावं लागलं,त्याच आरक्षणाच्या सोडवणुकीची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर सोपवली. कोणी जायला तयार नव्हतं,जिथं पुढारी पाऊल टाकायला घाबरत होते तिथं विखे पाटील निर्धाराने गेले. मराठा समाजाला आधार दिला.काही लोक मनोमन खूश झाले होते आता हे फसतील पण देवाची कृपा, गरीबांचा आशीर्वाद, ४० वर्षांचा कौटुंबिक त्याग आणि प्रामाणिकपणा यामुळे आम्ही हे यश मिळवलं. जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं तेव्हा स्पष्ट सांगितलं – मुख्यमंत्र्यांसोबत याचं श्रेय विखे पाटलांनाही आहे. संदेश स्पष्ट आहे – विखे परिवार संपवण्याची भाषा करणारे संपले,पण विखेंचं जनतेवरील प्रेम, विश्वास आणि ताकद आजही ठाम उभी आहे.
