आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते रानभाज्या, कडधान्य महोत्सवाचे उद्घाटन

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 
शिरसगाव येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत पारंपरिक रानभाज्या,कडधान्य महोत्सव व आनंद मेळावा उत्साहात झाला.
            छायाचित्र अजित अशोक ब्राह्मणे 
उद्घाटन महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा शिरसगाव मुरंबी,ठाणापाडा, बोरीपाडा, देवडोंगरा,खरशेत, ओझरखेड, बेरवळ, मुलबड या शाळांतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी पारंपरिक रानभाज्या, कडधान्य व स्थानिक खाद्यपदार्थाचे आकर्षक स्टॉल्स सादर केले.

यावेळी वास्ता, तेरा,अंबाडी, माठ,पेना, खुरसणी, कवदा, तांदुळका, लोती, आक्रा, आळींब तसेच कुळदाचे बेसन, उडदाचे पदार्थासह नागली, तांदूळ, बाजरी यांच्या भाकरी यासारख्या भाज्यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्स्फूर्त सहभाग लाभला. 

उपस्थित मान्यवरांनी विद्याथ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मुख्याध्यापक, अधीक्षक,शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले. हा उपक्रम पर्यावरणपूरक, आरोग्यवर्धक आहार आणि आदिवासी संस्कृतीचे जतन यांचा उत्तम संगम ठरला.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!