आश्वी खुर्दच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना साश्रू नयनांनी निरोप

Cityline Media
0
​आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्दच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तीन कर्तव्यनिष्ठ शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले,तर पालकांचे मन गहिवरून आले.या शिक्षकांनी फक्त पुस्तकी ज्ञानच नाही,तर जीवनातील मोलाचे संस्कार आणि प्रत्येकाला जगाचे ज्ञान दिले असे यावेळी अनेकांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.
​सरपंच सौ.अलका गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निरोप समारंभात बाळकृष्ण भालेराव, सौ.भारती नागरे आणि सौ.स्वाती ढमक यांच्या योगदानाला आदराने उजाळा देण्यात आला.या तिघांच्या कार्यकाळात शाळेची पटसंख्या ५० वरून १०५ पर्यंत वाढली.

गावाच्या आसपास इतर चांगल्या शाळा असतानाही,या शिक्षकांनी आपल्या निस्वार्थ मेहनतीने शाळेला एक वेगळी ओळख मिळवून दिली.यावेळी,कर्मवीर भाऊराव पाटील विद्या निकेतनचे प्राचार्य सयाराम शेळके, ग्रा.प. सदस्य सागर भडकवाड,संपत भोकरे, तब्बसुम सय्यद,

मंच्छिंद्र गायकवाड, सुमित गायकवाड, संपत शिंदे,सुभाष भोसले,किर्ती यरमल,कैलास मुन्तोडे,बबिता घोडके,श्रीमती बलसाने,श्रीमती वालझाडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. कल्पना क्षीरसागर,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. प्रज्वली खरात, मा.अध्यक्ष अभय वाळेकर,जगदीश मुन्तोडे, संजय खरात,कल्पना राक्षे, श्रीकांत तक्ते, सुनील क्षीरसागर, सोमनाथ क्षीरसागर, गणेश क्षीरसागर, अमोल गायकवाड, सौ. ज्योती भवर, सौ. सुजाता भडकवाड, सौ.अश्विनी वायदंडे, सौ. इंदुबाई क्षीरसागर, सौ. छाया भडकवाड, सौ.विमल भडकवाड, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस,शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक वर्षा लावरे -दातीर यांनी केले.​या भावपूर्ण वातावरणात शाळेच्या जुन्या इमारतीची आणि डिजिटल सुविधांच्या कमतरतेची चर्चाही झाली.आपल्या लाडक्या शिक्षकांना निरोप देताना, उपस्थित असलेल्या अनेकांनी माजी विद्यार्थी आणि दानशूरांना आवाहन केले की,या शाळेसाठी नवीन आणि सुसज्ज इमारत उभी करण्यासाठी तसेच डिजिटल वर्ग सुरू करण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन मदत करावी. ही केवळ एक शाळा नसून, ती गावाच्या भविष्याची पायाभरणी आहे,असे भावनिक मत प्रसंगी अनेकांनी व्यक्त केले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!