दिंडोरीतील युवक मित्रमंडळाचे कार्य कौतुकास्पद : पोलिस निरीक्षक शेगर

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी येथील युवक मित्र मंडळ छत्रपती संभाजी चौक (गॅटी) च्या वतीने सामाजिक उपक्रम राबविले असून या मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. या मंडळाचा इतर मंडळांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी केले.
दिंडोरी येथील युवक मित्र मंडळ छत्रपती संभाजी चौक (गंटी) च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी रघुनाथ शेगर बोलत होते. या उपक्रमातंर्गत भव्य रक्तदान शिबिर,तसेच दंत तपासणी व मार्गदर्शन शिबिर आणि नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

विघ्नहर्ता डेंटल क्लिनिकच्या डॉ. कोमल बोरसे यांनी तब्बल १२० रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. तसेच सी-साई नेत्र केअरचे डॉ. वैभव मोरे यांनी १६५ रुग्णांची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले.समता ब्लड सेंटर यांनी ५२ बॅग रक्ताचे संकलन केले. कार्यक्रमास राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवक मित्र मंडळाचे पदाधिकारी,कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!