नाशिक दिनकर गायकवाड पद्मश्री कर्मवीर खासदार दादासाहेब गायकवाड जन्मभूमी स्मारक उद्घाटन आज शनिवार (दि.१३) सायंकाळी ४ वाजता आंबेदिंडोरी येथे खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
राष्ट्रवादी अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, खा.भास्कर भगरे, खा.
नीलेश लंके, खा.राजाभाऊ वाजे,आ. जयंत पाटील, आ.जितेंद्र आव्हाड, आ. रोहित पवार, मा.आमदार सुनील भुसारा, शरदवंद्र पवार राष्ट्रबादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष दत्तात्रय पाटील, जे.
पी.गावित, धनराज महाले, रामदास चारोस्कर, रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे, गोकुळ पिंगळे, जयंत दिंडे, सुनीता चारोस्कर, शहाजी सोमवंशी, विद्या पाटील, प्रवीण जाधव, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष एनाकर पगारे, युवक जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
