अमृतवन परिवार व एकदंत प्रतिष्ठानचे मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती संकलन

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड येथील शांतीनगर, मखमलाबाद मध्ये अमृतवन परिवार व श्री एकदंत गणेश प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे कृत्रिम तलाव व मूर्ती संकलन केंद्र सुरू करण्यात आले.यावर्षी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळून मोठ्या प्रमाणात मूर्ति संकलन झाले,ज्ञानेश्वर काकड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करत असताना निर्माल्य व गणेशमूर्ती जमा करून गोदामाई अविरल व प्रदूषणमुक्त होण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल उपक्रमात सामील झालेल्या सर्वांना सन्मानपत्र देण्यात आले.४ मोठे कलश भरुन निर्माल्य तसेच २ आयशर व ४ पिक अप गाड्यांमध्ये प्रत्येक गाडीत ३ थर इतक्या मुर्ती संकलीत झाल्या.

याप्रसंगी संजय बोराडे ,श्रावण सूर्यवंशी ,नरेंद्र जाधव,अंबादास शेलार ,एकनाथ दिघे ,उद्धव पवार,वामन शिरसाठ,शेखर शिंदे , सुभाषचंद्र श्रीवास्तव,राजू पानसे, स्वप्निल दाणी, देविदास पवार, किरण गंभीरे, संजय उदावंत ,संजय सोसे ,गजानन अहिरराव, संदिप मानकर,संजय मोरे यांसह महिला मंडळाच्या सुनिता काकड, जयश्री गावित, विद्या बोराडे, संगीता सूर्यवंशी, सुवर्णा जाधव ,सुवर्णा शिंदे, मनीषा सानप ,राजश्री जाधव ,सुनंदा कुमावत आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुदर्शन काकड, रोहित बोराडे, सचिन देसाई,सुचंद्र ढाकणे, शिवम देशमुख, आदींनी परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!