अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनसामान्यांची त्रेधातिरपीट

Cityline Media
0
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाईची अपेक्षा 

अहिल्यानगर विठ्ठलदास आसावा राज्यात पावसाचा हाहाकार सुरू असताना जिल्ह्यात काल संध्याकाळपासून ते दि. २८ सप्टेंबर पहाटेपर्यंत सर्वदूर संततधार पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले तर सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट झाली आता जरी पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी पुन्हा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
राहाता तालुका  शिर्डी-साकोरी (नगर-मनमाड महामार्ग) हॉटेल फाऊंटन जवळ नाल्यात ४ व्यक्ती वाहून गेल्या. त्यापैकी अक्षय गोरे व अमोल व्यवहारे यांना वाचवण्यात यश आले असून रोहीत खरात व प्रसाद विसपुते यांचा शोध सुरू आहे.
जामखेड तालुका पिंपळगाव उंडा येथे घराची भिंत कोसळून पारूबाई किसन गव्हाणे (वय ६८) यांचा मृत्यू. नेवासे तालुका – चिलेखनवाडी येथे पिराजी भिमराव पिटेकर (वय ८०) घराची भिंत कोसळून मृत्यू.
 पिंपळगाव माळवी – तलाव ओव्हरफ्लो होण्यास अवघे ४ इंच राहिले असून पुराचे पाणी अहिल्यानगर शहराकडे जाण्याचा धोका. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
 संगमनेर तालुका – मौजे सादतपूर येथे पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्याने बोरसे वस्तीतील ७० कुटुंबे (२२४ लोक) संपर्कविहीन. प्रशासन संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करत आहे. मेहकरी नदी – पूरस्थिती; पारेवाडी, पारगाव-भातोडी रस्ता बंद. ५-६ बंधारे फुटून पाणी शेतात घुसले.
कापुरवाडी तलाव – पूर्ण भरल्याने मौजे नागरदेवळे येथील ४-५ घरात पाणी शिरले. नागरदेवळे-भिंगार रस्ता बंद.श्रीगोंदा तालुका – मांडवी नदीला पूर आल्याने बनंपिप्री ते काकडे वस्ती रस्ता बंद.
धरणांची स्थिती – जायकवाडी, नांदूर मधमेश्वर, भंडारदरा, निळवंडे, मुळा, सीना, कुकडी, खैरी आदी धरणे ओव्हरफ्लो. हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे तरी विस्कळीत झालेले जनजीवन पुर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!