झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील परिसरातील शिबलापुर मंडलातील गावांना अतिवृष्टीच्या पावसाने पिकांना प्रचंड फटका बसला असून काढणीला आलेल्या बाजरी तुर सोयाबीन व चारा पिके भुई सपाट झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी झरेकाठी ग्रामपंचायत सदस्य अर्चना वाणी,सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांनी एका निवेदनाद्वारे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांच्याकडे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गत एक महिन्यापासून झरेकाठीसह पंचक्रोशीतीत पाऊस सातत्याने पडत आहे परंतु दोन ते तीन दिवसापासून प्रचंड मोठा असा अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे आता ओढे,नाले तुडुंब भरून वाहत आहे तर कित्येक शेतामध्ये तळ्याचे स्वरूप आल्यामुळे काढणीला आलेल्या बाजरी तुर मका सोयाबीन व चारा पिकाला याचा मोठा फटका बसला .
त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे एकीकडे शेतकरी अनेक अडचणीला तोंड देत असताना या अस्मानी संकटाने शेतकरी पूर्णपणे हवालदील झाला आहे. सध्या चारा पिके ही पाण्यात गेल्यामुळे शेतकरी कुठे आर्थिक संकटात सापडला आहे तसेच
झरेकाठी,पिंपरी लौकी,खळी, पानोडी ,दाढ चणेगांव या परिसरामध्ये व गावांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बाजरी सोयाबीन मका ही पिके काढणीला आली होती तसेच घास गिनी गवत ही जनावरांची चाऱ्याची पिके ही नेस्तासाबूत झाली आहे त्यामुळे एकीकडे चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना दुसरीकडे पिके वाया गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे .सध्या शेतकऱ्याची अवस्था चिंताजनक अशी झाली आहे .एकीकडे प्रचंड खर्च करून पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेली डोळ्यासमोर पिके भुईसपट झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे .
संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या झरेकाठी ग्रामपंचायत सदस्य सौ.अर्चना रमेश वाणी,सोसायटीचे अध्यक्ष भिमाजी बोंद्रे .राजेश गायकवाड, सोमनाथ डोळे अशोक तळेकर सुरेश नागरे सचिन आव्हाड, नारायण कहार, हभप शांतारामम जोरी भाऊसाहेब लावरे ,भासाहेब मुंडे, सरपंच सतिश जोशी ,भिमराज गिते, अध्यक्ष सिताराम दातीर उपसरपंच बाजीराव गिते अशोक गिते रमेश गिते,श्रीकांत दाभाडे, राहुल वाणी, अभिनव वाणी, तबा मुन्तोडे रमेश कदम दिलिप लावरे आदी शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे या भागातील एक शिष्टमंडळ लवकरच जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. यांना भेटणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
