पिंपरखेडला रामभाऊ घडवजे यांच्या शेतात बिबट्या पिंजऱ्यात कैद

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथे नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला असून शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला तरी येथे अजून बिबट्या असण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे वनविभागाने या परिसरात पिंजरा तेथेच ठेवावा, अशी मागणी होत आहे.
संदीप जोशी, गणेश जोशी यांच्या शेतात मजूर काम करत असताना बिबट्याचा एक बछडा आढळून आला. त्यानंतर बनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी पंकज परदेशी, एव.एस. कामडी, भोये, दशरथ कडाळे,आनंद पेलमहाले यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यांनी त्याच शेतात ते बछडे ठेऊन कॅमेरा लावला होता.पण मादी बिबट्या बछड्याजवळ आलीच नाही.त्यानंतर त्यांनी ते बछडे वनविभागाच्या निगराणीत पाठवले.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच रामभाऊ घडवजे यांच्या शेतात काही दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता.त्या पिंजन्यात रात्री नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. या परिसरात दोन ते तीन बिबटे असून त्यातील एक नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला.

 अजून एक मादी, तिचे बछडे गावजवळच जोशी यांच्या शेतात आहेत.वनविभागाच्या अधिक-यांनी सांगितले की, नागरिकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी,रात्री बाहेर पडू नये, जनाको गोठ्यात बांधावी तसेच घराच्या परिसरात लाईट लावावे, पिंपरखेड येथील पोलीस पाटील संजय धात्रक, उपसरपंच वसंत घडबजे,सुखदेव मोरे,उमेश जोशी यांनी वनविभागाला अजून पिंजरे लावावे,अशी मागणी केली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!