अहिल्यानगर प्रतिनिधी जिल्हा परिषद,अहिल्यानगर यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम नुकताच नगर कल्याण रस्त्यावरील द्वारका लॉन्स येथे राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पार पडला.
याप्रसंगी, विधान परिषद सभापती राम शिंदे आमदार .काशिनाथ दाते,आमदार.विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी.पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी.आनंद भंडारी, पोलिस अधीक्षक .सोमनाथ घार्गे, जि.प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी.विजय मुळीक, भाजपा जिल्हाध्यक्ष .दिलीप भालसिंग, भाजपा शहराध्यक्ष .अनिल मोहिते, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) श्रीमती गायकवाड यांच्यासह आदी मान्यवर, जि.प.चे इतर अधिकारी, कर्मचारी व शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
आजचा हा पुरस्कार वितरण समारंभ हा विशेष होता. कारण सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तिन्ही वर्षांतील जिल्हा शिक्षक पुरस्कार एकत्रितपणे आज प्रदान करण्यात आले मागील काही वर्षांत ज्यांनी आपल्या कार्यातून विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले, समाजात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित ठेवली,अशा शिक्षकांचा आज जिल्ह्याच्या वतीने सन्मान करण्यात आला.
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपण हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे. विद्यार्थी घडवणे म्हणजे राष्ट्र उभारणे, ही जाणीव आज प्रत्येकाच्या मनात दृढ झाली.
मी स्वतः प्राध्यापक म्हणून वर्ग शिकवला असल्याकारणाने शिक्षक या भूमिकेचे महत्त्व मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळालेले आहे. शिक्षकांनी काळानुरूप स्वतःला अपडेट ठेवले पाहिजे. बदलत्या काळाशी जुळवून घेणे हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहे. सगळ्यात पवित्र सेवा म्हणजे शिक्षकाची सेवा आहे. शिक्षक विषयाबरोबरच मूल्ये आणि जीवनाचे धडे देतात.वर्ग शिकवणारा शिक्षक उद्याचा समाज आणि उद्याचे नेतृत्व घडवतो. त्यामुळे प्रत्येक शिक्षक हा राष्ट्रनिर्मितीतील अनमोल घटक आहे. असे प्रतिपादन प्रा राम शिंदे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात उपस्थित शिक्षक, मान्यवर,पालक आणि विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे वातावरण प्रेरणादायी व भावपूर्ण झाले.
