आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र
संगमनेर संपत भोसले संगमनेर येथील शिवसैनिक सौरभ राजेंद्र देशमुख यांची युवा सेनेच्या उप जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली असल्याचे पत्र आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते नुकतेच महायुती जनसंपर्क कार्यालयात देण्यात आले.
आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थित सौरभ देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला.आमदार खताळ यांच्या खांद्याला खांदा लावून ते शिवसैनिक म्हणून आता पर्यंत काम करत आहे. त्यांनी शिवसेना सभासद वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून तरुणांचे संघटन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर युवा सेना उपजिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे आमदार अमोल खताळ युवासेनेचे राज्य कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते
जिल्हाप्रमुख शुभम वाघ यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासास कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ न देता युवा सेनेच्या माध्यमातून तरुणांचे संघटन वाढविण्यावर भर दिला जाईल.
गाव तेथे युवासेनेना शाखा सुरू करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे नवनिर्वाचित युवासेना उपजिल्हा प्रमुख सौरभ देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिनेश फटांगरे मा.नगरसेवक अविनाश थोरात अण्णासाहेब शेलकर युवासेनेचे सुशील शेवाळे आणि सार्थक शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
