- राहुरी ग्रामीण रुग्णालयात बेडवर रुग्णांऐवजी कुत्र्यांच्या वावरांमुळे जनता संतप्त
म्हैसगांव कमलेश विधाटे राहुरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील बेडवर आजारी रुग्णाऐवजी नेहमी कुत्र्यांचे झोपणे सुरू झाले आहे याकडे येथील डॉक्टर व कर्मचारी अक्षरशःदुर्लक्ष करत असल्यामुळे येथे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे येथील डॉक्टर आणि कर्मचारी फक्त हजेरी लावून घरी निघून जातात की काय? अशी शंका लोकांना आणि रुग्णांना येते यापूर्वी राहूरी येथील महिला संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष वर्षा बाचकर ,स्नेहल दिवे , सावित्राबाई वाचकर ,संदीप कोकाटे आदीसह संतप्त कार्यकर्त्यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयबाबत राहुरी येथे आंदोलन केले होते.
या शासकीय दवाखान्यात अनागोंदी सुरू असुन हा दवाखाना आहे की कुत्र्या मांजराचे अड्डा असा संतप्त सुर जनतेतून निघत आहे या ठिकाणी रुग्णांवर उपचार केला जात नाही फक्त तसा दिखावा केला जातो.
या भोंगळ कारभाराबद्दल यापूर्वी आंदोलन करण्यात आले होते परंतु त्या आंदोलनाला यश आले नाही,तो भाग वेगळा मात्र आता पाहिल्या सारखा अनागोंदी कारभार चालूच आहे कुत्र्यांनी मनुष्य रुग्णांच्या बेडची जागा घेतली व आराम करण्यासाठी सुरवात केली तरी अद्याप पर्यत कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांना याची भणक सुद्धा लागली नाही.
या शासकीय रुग्णालयाची दुरावस्था होत चालली आहे यापूर्वीच्या आंदोलनास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुरेपूर प्रतिसाद दिला नाही कारण त्यात अनेक जण दोषी आढळून आले असते परंतु आता हा प्रकार प्रसार माध्यमांसमोर आल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
येथील वैद्यकीय अधिकारी परिचारिका आणि सफाई कर्मचारी या प्रकाराकडे बघून एकमेकांकडे बोट दाखवत आहे इथल्या अस्वच्छ आणि कुत्र्या मांजराच्या बिंधास्त वावरामुळे हे रुग्णालय जिल्ह्यात अधोरेखित होत आहे इथे येणारे रुग्ण उपचार न घेता आल्या पावली मागे फिरत आहे.
वरिष्ठ वैद्यकीय आधिऱ्यांनी ह्या प्रकराकडे लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे त्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे बेडवर पेशंट ऐवजी कुत्र्यांचे झोपणे चालू झाले या रुग्णालयात रुग्ण येणे जवळजवळ बंद झाले आहे तरी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका सफाई कर्मचारी यांनी यांच्या निष्काळजीमुळे हा दवाखाना बंद होऊ नये इतकेच याप्रकराकडे वरिष्ठ शासकीय अधिकारी यांनी लक्ष घालून ॲक्शन मोडवर यावे अशी मागणी संतप्त रुग्णांकडून होत आहे अन्यथा या प्रकारामुळे तिव्र आंदोलनाचा इशारा येथील त्रस्त नागरिक,रुग्ण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
