जामखेडच्या बटेवाडी येथील इसमाकडून एक गावठी कट्टा व जिवंत काडतुस जप्त

Cityline Media
0
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे पथकाची धडक कारवाई 

जामखेड प्रतिनिधी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने बटेवाडी, ता.जामखेड येथुन गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगणारा इसम घेतला ताब्यात.
सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांनी पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे बाळगणा-या इसमांविरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये स्थानिक गुन्हे पथक जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या बाबत माहिती घेताना दिनांक ४ सप्टेबरला पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे संदिप बंडु मरकड रा. बटेवाडी, ता.जामखेड  हा त्याचे कब्जामध्ये विनापरवाना गावठी कट्टा व काडतुस बाळगुन जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे बटेवाडी,ता.जामखेड येथे उभा आहे,आता गेल्यास मिळुन येईल.
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/अनंत सालगुडे, सफौ/रमेश गांगर्डे, पोहेकॉ/हदय घोडके, पोना/शामसुंदर जाधव अशांचे पथक नेमुन पंचाना सोबत घेवुन, बातमीतील संशयीताची माहिती घेवुन तो मिळुन आल्यास त्यास ताब्यात घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

पोलीस पथकाने दिनांक ४ सप्टेंबरला जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे बटेवाडी, ता.जामखेड येथे जावुन खात्री करता बातमीतील वर्णनाप्रमाणे एक संशयीत इसम मिळुन आला. त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या  संशयीतास पोलीस पथकाची ओळख 

सांगुन त्यास त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव संदिप बंडु मारकड वय-२१ वर्षे रा.बटेवाडी, ता.जामखेड असे असल्याचे सांगितले. त्यास दोन पंचासमक्ष गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाबत विचारपुस करता त्यांनी लपवुन ठेवलेले  ३५,०००/- 

रुपये किंमतीचा एक देशी बनावटीचा कट्टा व १,०००/- रुपये किंमतीचे १ जिवंत काडतुस असा एकुण ३६,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.
ताब्यातील आरोपी याचेविरुध्द पोकॉ/२५७४ मनोज मोहन साखरे नेम. स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर 

यांचे फिर्यादीवरुन जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं. ४९७/२०२५ आर्म ऍ़क्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी नामे संदिप बंडु मारकड वय-२१ वर्षे रा.बटेवाडी, ता.जामखेड आणि  एक गावठी कट्टा व एक काडतुस असा एकुण ३६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जामखेड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असुन, पुढील तपास जामखेड पोलीस ठाणे हे करीत आहे.सदरची कारवाई अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!