नियोजन शून्य पार्किंग मुळे कळवण मध्ये वाहतुकीची कोंडी.

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड कळवण शहर तालुक्याचे मुख्यालय असल्याने येथे दररोज विविध खेड्यातून हजारो नागरिक कामानिमित्त ये-जा करतात.शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे मात्र,शहरातील रस्ते संकुचित असून, नियोजनशून्य पार्किंग, अतिक्रमण व वाहतुक नियंत्रणाचा अभाव यामुळे संपूर्ण शहर वाहतूककोंडीच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे कळवणकरांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
शहरातील अनेक ठिकाणी दुचाकी, चारचाकी वाहनचालक मनमानीपणे रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. रस्ता आधीच अरुंद असल्याने वाहतु की बर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. बाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यावसायिक व प्रवासी यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. शहरात वाहनतळ नसल्याने महाराजा चौक, बसस्टैंड परिसर, जुना ओतूर रोड व बाजारपेठ या भागांत नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होते. अतिक्रमणामुळे रस्ते ठप्प असून टपरीधारक, फळ विक्रेते, तसेच परप्रांतीय यांच्या हातगाड्या रस्त्यावर उभ्या राहत आहेत.

महाराजा चौक परिसर अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू बनला आहे. फळ विक्रेत्यांच्या गाड्या, टपऱ्या यामुळे नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले आहे. सायंकाळी सातनंतर महाराजा चौकात चायनीज व पावभाजीच्या गाड्या लागतात. रस्त्यावरच दुचाकी लावल्या जातात. दिवसभर चहा टपऱ्यांवर गर्दी असते. तेथे रस्त्यावरच दुचाकी लावल्या जातात. त्यामुळे निम्मा रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो.

मागील महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणधारकांना नोटिसा काढल्या होत्या,पण त्यानंतर काहीच झाले नाही.कळवणचा मेनरोड दोन दिवसात मोकळा होऊ शकतो, पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत आहे.

 एखादी मोठी दुर्घटना होऊन नागरिकांचा बळी जाईल तेव्हाच यांना जाग येईल, असे नागरिक बोलून दाखवत आहेत. वारंवार कारवाईचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र कोणतीही प्रभावी कारवाई होत नाही, अशी नाराजी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. कळवण सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार, भूमी अभिलेख विभाग, पोलीस तसेच नगरपंचायत प्रशासन यांची संयुक्त बैठक झाली, पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही.कळवण पोलीस ठाण्यात अपुरे मनुष्यचळ असल्याने शहरात वाहतूक पोलिसाची नेमणूक नसल्याने त्याचा फायदा बेशिस्त वाह्मचालक घेऊन मनमानी करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!