अहिल्यानगर प्रतिनिधी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास वसाहत पोलीस ठाणे हद्दीतील,शिंगवे नाईक गावातील श्री राम मंदीर,श्री.शिरोमणी सावता महाराज मंदिर,भैरवनाथ मंदिर येथे नुकतीच चोरी झाली होती.
त्या चोरीतील आरोपीना पोलिसांनी तात्काळ अटक करुन चोरीस गेलेले देवाचे मुकुट तसेच इतर दागिने व दानपेटी मधील पैसे आरोपीकडुन हस्तगत केले ते नुकतेच जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी
गावकऱ्यां समक्ष मंदिरात जावुन परत केला त्याबद्दल सर्व गावकरी भावुक होत त्यांनी पोलिस विभागाचे आभार व्यक्त केले.
