नाशिक दिनकर गायकवाड गेल्या अनेक दिवसांपासून पेठ तालुक्यातील उस्थळे गाव आणि परिसरात मुक्त संचार करीत असलेला बिबट्या अखेर वनविभागाने लाबलेल्या पिंज-यात जेरबंद झाला.
छाया रेखांकन-प्रकाश कदम
उस्थळे परिसरात बिबट्याचे अनेकांना दर्शन झाल्याबाबत नागरिकांनी वनविभागाला कळवले होते,वन कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून बिबट्याचा बावर असल्याची खात्री केली. या परिसरात पिंजरा लावण्याची ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर वनविभागाने बुधवारी सायंकाळच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा लावला. गुरुवारी पहाटेच्या सुमारास साधारण तीन वर्षे वयाचा
बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. याचाबत वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बनरक्षक तानाजी भोये, मझहर शेख, दिलशान पठाण,भरत चौधरी, कुसुम गवळी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्यास जेरबंद करण्यात आले.उस्थळे परिसरात मागील महिनाभरापासून बिबट्याचा बाबर असल्याने वनविभागाच्या वतीने चिबट व मानव संघर्ष व बचाव याबाबत जनजागृती कार्यकम घेऊन नागरिकांना सतर्क केले होते. परिसरातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चिंतेने पिंजरा लावण्यासाठी तगादा होत असल्याने त्याची दखल घेतल्याने चिबट्या जेरबंद झाला.
