पेमगिरी येथील शहागडावर नवरात्र उत्सव निमित्त आमदारांच्या हस्ते पेमादेवीची महाआरती
संगमनेर संपत भोसले आतापर्यंत व्यवस्थेकडून शालेय विद्यार्थ्यांना ठराविक महापुरुषांचा इतिहास शिकवला गेला मात्र आता हिंदुत्वासाठी आणि धर्मरक्षणासाठी काम करणाऱ्या किर्तनकारांनी नारदाच्या गादिवरून हिंदू धर्माबाबत प्रबोधन सुरू केले आहे.ही एक आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ठ आहे.येथून पुढील काळात देश आणि धर्म टिकविण्यासाठी तरुण पिढीने पुढाकार घ्यावा असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी यावेळी तरुणांना दिला.
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील शहागडावरती आयोजित नवरात्र उत्सवा निमित्त अनिल महाराज देवळेकर यांचे किर्तन आयोजित केले होते या किर्तनाला समारंभास आमदार अमोल खताळ यांनी हजेरी लावली त्यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर अनिल महाराज देवळेकर भाजपचे उपाध्यक्ष दिलीप कोल्हे प्रमोद डुबे,दत्ता वनपत्रे हौशीराम महाराज कोल्हे सुधीर शिंदे संदीप डुबे अनिल डुबे सुभाष कोल्हे प्रवीण पावसे स्वप्निल डुबे निखिल दीक्षित दत्ता शेटे देवेंद्र डुबे ज्ञानेश्वर चव्हाण रवींद्र डुबे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे बोलताना म्हणाले की मी हिंदू आहे आणि मला माझ्या हिंदू धर्माचा अभिमान आहे त्यामुळे मी आमदार असलो तरी हिंदुत्वासाठी कायम काम करत राहीन.पेमगिरीचा महाकाय वड आणि शहागड या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. यावर्षीच्या नवरात्रीमध्ये अर्ध्या भागातील स्ट्रीट लाईटचा प्रश्न सुटला आहे .मात्र पुढील वर्षीच्या नवरात्रामध्ये गडाच्या पायथ्या पासून ते टोकापर्यंत संपूर्ण स्ट्रीट लाईट केली जाईल आणि या गड परिसराचा सर्वांगीण विकास केला जाईल असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केले
हिंदू धर्म प्रचारक देवळालकर महाराज म्हणाले की जो धर्मरक्षणासाठी पुढे राहतो त्याच्यामागे आपण सर्वांनी ठामपणे उभे राहिले पाहिजे. हिंदू धर्मासाठी तरुणांनी पेटून उठावे,आपल्या आया बहिणींना ‘ लव्ह जिहादच्या बळी पडू देऊ नका धर्म रक्षणासाठी सज्ज व्हा.असा सल्ला दे या पेमगिरी गावातून कट्टर हिंदुत्ववादी तरुण या गावातून निर्माण झाले पाहिजेत हिंदुत्वासाठी आमदार अमोल खताळ यांनी गावागावात प्रामाणिकपणे काम करत आहे . त्यांच्या मागे सर्वांनी भक्कम उभे राहावे असे आवाहन देवळालकर महाराज यांनी यावेळी केले
-संभाजीराजेचा अजेय विजय
हिंदू म्हणून जगणार अन हिंदू म्हणूनच मरणार असे औरंगजेबाला दरडावून सांगणारे जगातील एकमेव राजे छत्रपती संभाजी महाराज हे होते.छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने हाल हाल करून मारत असतानाच्या प्रसंगाचे वर्णन उपस्थितांसमोर हावभाव करून करत असताना अनिल महाराज देवळेकर आणि उपस्थित भक्तगणांना अक्षरशःगहिवरून आले होते.
