दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील खळी येथे काल दुपारी व रात्री अतिवृष्टी पाऊस झाल्याने खळी गावातील बौद्ध वस्तीतील तीन कुटुंब आलेल्या पुरामुळे येथील शिवाजी वाघमारे बाळासाहेब वाघमारे अनिल तेजाड आदि तीन कुटुंबाच्या घरामध्ये कालच्या अतिवृष्टी पावसाने जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडल्याने या तीनही कुटुंबाला ग्रामपंचायत प्रशासन व महसूल विभागाने तात्काळ खळी गावात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत मध्ये तात्पुरते त्यांचे राहण्याची व्यवस्था करून त्या कुटुंबाला महसूल विभाग व ग्रामविकास विभागाने आधार दिला आहे.
काल दुपारी व मध्यरात्री भरपूर पडलेल्या पावसामुळे येथील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे गावचे ग्रामसेवक अनिल वाणी व महसूल ग्राम अधिकारी तलाठी यांनी खळी गावामध्ये येऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून ओढे नाले व तळे लगत असणाऱ्या कुटुंबांना सतर्कतेचा इशारा देऊन ज्या कुटुंबाला शासकीय मदत करता येईल त्यांना मदत करून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.
खळी गावांमध्ये पाऊस झाल्याने गावातील सर्व ओढे व नाले संपूर्णपणे जलमय झाले असून येथील पाझर तलाव पूर्णपणे तुडुंब भरून ओव्हर फ्लो झाले आहे तसेच येथील निळवंडे पाठ हा पण पूर्ण क्षमतेने वाहत असून याचे ओव्हर फॉलचे पाणी सर्व शेतकऱ्यांच्या शेतात साचल्यामुळे पाठाचे पाणी व अतिवृष्टीचे पाणी यामुळे सर्व शेतातील पिके सडले आहे.
येथील खरीप हंगाम हा पूर्णपणे वाया गेला असून शासनाने याचे पंचनामे करून त्वरित येथील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये व त्यांच्या घरामध्ये पाणी गेले त्यांना २५ हजार रुपयाची मदत करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ नागरे यांनी तलाठी ग्रामसेवक यांच्याकडे केली.
त्यांनी म्हटले आहे की खळी गावांमध्ये ८० वर्षाच्या कालखंडात असा पाऊस कधी झाला नव्हता असा पाऊस येथे झाल्यामुळे येथे पाणीच पाणी झाले असून येथील खरीप हंगाम हा पूर्णपणे वाया गेला आहे तसेच त्यांनी येथील गावां मधील असणारे सर्व जुने ओढे नाले महसूल विभागाने पूर्णपणे त्याची अतिक्रमण काढून मोकळ्या करावे व त्याची रुंदी वाढवावी तसेच ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना लेखी समज देऊ तात्काळ अतिक्रमण काढावे अशी मागणी करत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला महाराष्ट्र शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी केली.
