कोपरगाव प्नतिनिधी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि. व संजीवनी ग्रुप यांचा,देशातील पहिला सहकारी कॉम्प्रेस्ड बायो गॅस (सी.एन.जी) प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ,नुकताच केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते तसेच, मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संजीवनी युनिव्हर्सिटी ग्राउंड, कोपरगांव येथे उत्साही वातावरणात पार पडला.
प्रसंगी,सहकार महर्षी मा. मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतींना वंदन करून, कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, यावेळी, मनोगत व्यक्त करतांना केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी त्यांच्या कणखर निर्णयांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त केले
तसेच,या देशातील पहिल्या सहकारी कॉम्प्रेस्ड बायो गॅस (सी.एन.जी) प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्पासाठी एन सीडीसीच्या माध्यमातून मदत केल्याबद्दल देखील आभार व्यक्त केले, या सीएनजी प्रकल्पामुळे, २लाख १० हजार लिटर पेट्रोलची बचत होणार आहे,तसेच पोटॅश ची देखील आयात बचत होणार आहे
सहकार मंत्री अमित शाह पुढे मार्गदर्शन करतांना, म्हणाले की, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि. व संजीवनी ग्रुप यांनी देशातील पहिल्या सहकारी कॉम्प्रेस्ड बायो गॅस (सी.एन.जी) प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्प सुरू करून, देशातील सहकारी कारखान्यांपुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे, तुमचे योगदान अनंत काळापर्यंत स्मरणात राहील, तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मार्गदर्शन करून, शुभेच्छा दिल्या. या निमित्त कोपरगांव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले, तसेच ,संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे परिवारावर प्रेम करणाऱ्या आणि सभेसाठी उत्साही गर्दी करणाऱ्या सर्व, शेतकरी बांधव, कोपरगाव आणि पंचक्रोशीतील नागरिक, माता भगिनी, युवा मित्र सर्वांचे देखील यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ , मंत्री गिरीशजी महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आ आशुतोष काळे तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
