६,६०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.
अहिल्यानगर प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्याची माहिती घेत कारवाई करणेबाबत आदेश नुकतेच पोलिस प्रशासनास दिलेले आहेत.
आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिष भोये, पोलिस उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलीस अंमलदार दिपक घाटकर,शामसुंदर गुजर,बिरप्पा करमल,सोमनाथ झांबरे,राहुल डोके,विशाल तनपुरे,महादेव भांड, यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्याची माहिती घेत कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
नुकतेच पोलिस पथक सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास इसम नामे असिफ शेख व अविनाश बराटे हे दोघांनी गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याचे उद्देशाने जिवंत जनावरे आणलेले असुन ते कत्तलीसाठी घेवुन जाणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने बराटे वस्ती, घोडेगांव या ठिकाणी जावुन खात्री करता दोन इसम पिकअप वाहनातुन गोवंशीय जनावरे खाली उतरवतांना दिसली. सदर दोन्ही इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे १) असिफ अतिक शेख वय २८ वर्षे, रा. चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, २) अविनाश मोहन बराटे वय ३७ वर्षे,रा. बराटे वस्ती,घोडेगांव, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. दोन्ही इसमांचे ताब्यातुन १,६०,०० रुपये किमतीचे चा गोवंशीय जिवंत जनावरे, व ५,००,००० रुपये किमतीची पिकअप गाडी क्रमांक एम.एच. १७ बी. डी. ११२ असा एकुण ६,६०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपीविरुध्द पोना/४३७ सोमनाथ आसमानराव झांबरे नेम - स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. ३७१२०२५/ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम क. ५ (अ), ५(ब), ९(ब), प्राण्यांना निर्दयतेने वागविणेचे कलम ३ व११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सोनई पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
