मानवाने जंगलातील शांतता भंग केल्याने आश्वी खुर्द बाजारतळ बनला श्वापदांचा इलाका

Cityline Media
0
नागरिकांनी घ्यावी दक्षता;परिसरात भीतीचे वातावरण

​आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील ​आश्वी खुर्द गावाच्या पूर्वेकडील बाजारतळ परिसरात सध्या तरसांचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.गुरुवारचा आठवडे बाजार याच ठिकाणी भरतो.येथे मोठ्या प्रमाणावर मांसाहारी पदार्थांची विक्री होत असल्याने,बाजार संपल्यानंतर शिल्लक राहिलेल्या मांसाच्या तुकड्यांवर प्रथम कुत्रे आणि आता तरसही ताव मारत असल्याचे चित्र आहे.
येथील शेतकरी अक्षय दातीर यांनी नुकताच एका तरसाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.बुधवारी रात्री सुमारे ११ वाजता हे श्वापद बाजारतळ आणि ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विहिरीच्या परिसरात निदर्शनास आले ​पाणी आणि झुडपांमुळे वन्य जीवांचा वाढता वावर
​बाजारतळाच्या पूर्वेला प्रवरा उजवा कालवा,ग्रामपंचायतीची विहीर आणि दातीर वस्ती आहे.

पश्चिमेला आश्वी खुर्द गावची वस्ती आहे.या भागात पाणी आणि लपण्यासाठी मुबलक प्रमाणात झुडपे उपलब्ध आहेत. त्यामुळे बिबट्या, तरस आणि भटक्या कुत्र्यांना येथे थांबणे आणि फिरणे सोयीचे झाले आहे.

-​ मांसाच्या अवशेषांमुळे वाढली समस्या
​गुरुवारचा बाजार आश्वी खुर्दसह जवळपासच्या ८ ते १० गावांसाठीचे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे.मांसाहारी पदार्थांच्या विक्रीमुळे अवशेष बाजारतळावर पडून राहतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा वावर वाढतो आणि त्यांच्या मागोमाग बिबट्यांसह आता तरसही या परिसरात येऊ लागले आहेत.​दोन ते तीन तरसांचे नियमित येणे सातत्याचे झाले आहे.

येथील ​शेतकरी अक्षय दातीर यांनी दिलेल्या माहितीनुसार,या ठिकाणी दोन ते तीन तरस नियमितपणे येत आहेत.तरसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.या हिंस्र श्वापदामुळे परिसरातील नागरिकांनी ​दक्षता घेण्याचे आवाहन अष्टविनायक मंडळाचे उपाध्यक्ष आदीनाथ जाधव यांनी केले आहे.

याबाबत वनविभागाकडे मदतीची मागणी केली आहे ​या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना अत्यंत दक्षता घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.तसेच,या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी वनविभागाला त्वरित माहिती देऊन पाऊले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
​जागरूकता,दक्षता आणि सुरक्षा प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!