संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव संगमनेर पंचायत समिती सभापती पदाची सोडत नुकतीच जाहीर झाली.यामध्ये अनुसूचित जातीचा सभापती यासाठी आरक्षण आरक्षित झालेला आहे.
त्यामध्ये संगमनेर तालुक्यातून दोन गण म्हणजे वडगाव पान आणि घुलेवाडी अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहेत.वडगावपान महिलासाठी तर पुरुषांसाठी घुलेवाडी गण आरक्षित झाले आहेत.
घुलेवाडी गणातून शांत,संयमी,अभ्यासू व्यक्तिमत्व,सर्वांना सोबत घेऊन जाणारा,प्रचंड संघटनात्मक कौशल्य असलेले अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
जोर्वे ग्रामपंचायतचे माजी सदस्य,शांत,संयमी,अभ्यासू व्यक्तिमत्व,सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे बंटी यादव होय.त्यांचे बहुजन समाजात सर्वांबरोबर जिव्हाळ्याचे आपुलकीचे सामाजिक,राजकीय सबंध आहेत.ते नेहमी गरीब गरजू व्यक्तींच्या मदतीला तत्पर धावून जातात,सुख दुःखात उभे राहतात.
ग्रामपंचायत,तहसील जिल्हा परिषद ते पंचायत समिती प्रशासकीय कामासंदर्भात उत्तम जाण आणि माहिती असलेला कार्यकर्ता अशी ख्याती आहे.गेले दहा-बारा वर्ष काँग्रेस पक्षाचे विचार शोषित,वंचित, तळागाळातील घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत.उत्कृष्ट भाषण शैली,राजकारणाची उत्तम जाण असलेले व्यक्तिमत्व म्हणून बंटी यादव सर्व परिचित आहेत.
थोरात कुटुंबीयांशी आजोबांपासून एकनिष्ठ, प्रामाणिक असलेले जोर्वे गावातील यादव कुटुंब होय.
काँग्रेसचा वैचारिक वारसा चालविणारे संदीप तथा बंटी गोरक्षनाथ यादव यांना घुलेवाडी गणा मधून जनसेवेची संधी मिळाल्यास ते संधीचे सोने करतील अशी घुलेवाडी गणातील जनतेतून लोकभावना व सूर उमटत आहे.तसेच संदिप उर्फ बंटी गोरक्षनाथ यादव यांना घुलेवाडी गणा मधून मोठा पाठिंबा मिळत आहे.
