दाढ खुर्द येथे मंगळवार २५ नोव्हेंबर ते मंगळवार २ डिसेंबर दरम्यान हरिनाम सप्ताहाचे आयोजन.
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे ब्रम्हलीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरत्या १९ व्या नारळी सप्ताहास मंगळवार दि. २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान दाढ.खुदे येथे होणार आहे.
रामेश्वर व उबरेश्वर मठाचे महंत ह.भं.प दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दाढ खुर्द पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या पुढाकारातून आयोजन करण्यात आले असून सप्ताह स्थळी बुधवार २२ /ऑक्टोबर महंत दत्तगिरी महाराज याच्या हस्तें ध्वजारोहण करण्यात येणार आहे
दाढ खुर्द येथील दाढ फाटा पंधरा एकर क्षेत्रावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजारोहण दिनी हाती भगवे ध्वज,टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जप करण्यात येणार आहे भावभक्तीपूर्व ग्रामस्थानी सर्वाचेच लक्ष वेधून घेतली जाईल अशी २५ फूट उंचीच्या खांबावर याठिकाणी वारकरी संप्रदायाची पताका उभारली जाणार आहे. या मंगलमय वातावरणात महंत दत्तगिरी महाराज यांच्या हस्तें व दाढ खुर्द.व पंचक्रोशीतील.ग्रामस्थांच्या उपस्थितीत विधिवतपणे ध्वजारोहण करण्यात येणार आहे
दरम्यान या सप्ताह काळात नामवंत किर्तनकार आपली सेवा देणार असून पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे दाढ खुर्द आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थानी सप्ताह स्थळी जोरदार तयारी केली आहे.गावातील तरुण तसेच ग्रामस्थं यामध्ये सहभागी होणार आहेत यावेळी गावात मंगलमय सण-उत्संवाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचक्रोशीतील भाविकानी या सप्ताह सोहळ्यासाठी सप्ताह काळात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महंत दत्तगिरी महाराज व दाढ खुर्द व पंचक्रोशीतील ग्रामस्थानी केले आहे.
