नाशिक मधील अवाक्यातील घर म्हणजे मालकीचे घर ही मोहीम लोकांसाठीच

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपची वित्तीय सेवा शाखा असलेल्या गोदरेज कॅपिटलने त्यांची उपकंपनी गोदरेज हाऊसिंग फायनान्सच्या माध्यमातून 'पक्का पता' अर्थात मालकीचे घर ही नवीन मोहीम सुरू केली आहे.
नाशिकसह भारतातील उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये परवडणाऱ्या गृहनिर्माण वित्त उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे.

पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांचा भावनिक प्रवास ही मोहीम टिपते,तसेच भाड्याच्या जागेतून स्वतःच्या मालकीच्या घरात जाण्यासाठी गोदरेज

हाऊसिंग फायनान्सला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून मान्यता देते.या मोहिमेच्या केंद्रस्थानी एक साधा, सोपा पण सखोल दृष्टिकोन आहेः 'पक्का पता' म्हणजेच

कायमस्वरूपी पत्ता, हे भारतीय कुटुंबांचे सर्वांत मोठे स्वप्न असते. हा चित्रपट एका कुटुंबाच्या त्यांच्या नवीन, हक्काच्या घरात जाण्याच्या प्रवासाचे चित्रण करतो.

सामानाचे उघडे खोके आणि अर्धवट लावलेल्या खोल्यांमध्येही

एक हळवा क्षण समोर येतो. जेव्हा त्या मुलाचे वडील आपल्या मुलाची उंची ताज्या रंगवलेल्या भिंतीवर नोंदवितात पेन्सिलने नाही, तर कायमस्वरूपी मार्करने. आई

सुरुवातीला आश्चर्यचकित होते; पण वडील तिला हळूवारपणे आठवण करून देतात, की "ये हमारा खुद का घर है... इस घर में सिर्फ रहना नहीं है... इस घर में जीना है." कुटुंबाने त्यांचे हे नवीन घर स्वीकारले आहे, ज्यामध्ये केवळ मालकीची भावनाच नाही, तर त्यातून मिळणारी आपलेपणा व कायमस्वरूपीपणाची भावनादेखील अधोरेखित होते.

पारंपरिकपणे घर खरेदीसाठी चांगला मुहूर्त म्हणून दिवाळी व धनत्रयोदशीचे महत्त्व लक्षात घेत ही मोहीम धोरणात्मक रित्या आखण्यात आली आहे. परवडणा-या गृहनिर्माण वित्तपुरवठ्यासाठी ग्राहक-प्रथम दृष्टिकोन अधोरेखित करून या मानसिकतेचा फायदा करून घेण्याचा कंपनीचा उद्देश आहे, ज्यामुळे टियर-२ शहरांमध्ये घर घेणे अधिक सोपे होईल. कारण तेथील घरे आता परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!