येवल्यात अवैध अग्निशस्त्र जिवंत काडतुसे विक्री करणारे पोलिसांकडून तात्काळ जेरबंद

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड येवला शहरात अवैधरित्या अग्निशस्त्र, जिवंत काडतुसे बाळगुन विकी करणारे तिघे शहर पोलिसांनी जेरबंद केले असून एक संशयित फरार झाला आहे.
पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील,अपर पोलीस अधिक्षक तेगबिरसिंग संधु, उप विभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी अगामी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुका शांततेत पार पडाव्या, यासाठी अवैध शस्त्रसाठ्या शोध घेवून कारवाई करण्याबाबत सुचित केले होते.

तर दिपावली सणानिमित्त पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगार वॉच पेट्रोलींग फिरत असताना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सतिष मोरे, पोलीस शिपाई जनार्धन दळवी आणि ११२ डायल ड्युटीचे पोलीस शिपाई नवनाथ गायकवाड यांना खबऱ्यामार्फत दोन इसम अग्निशस्त्र बाळगून कोर्टाच्या परिसरात फिरत आहेत, अशी माहिती मिळाली. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास देवीखुंटाकडून कोर्टाच्या दिशेने एक सफेद रंगाची स्कुटर येताना दिसली. त्या स्कुटरला नंबर प्लेट नव्हती. तसेच त्याच्यासमोर रायफलचे

चित्र चिकटविलेले दिसले. त्यावेळी स्कुटरवरील इम्रान मुन्नवर पठाण, (वय २५, रा. शाह कॉलनी, फैजान ए मदिना मशिदजवळ, येवला) व एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि एक स्कुटर असा १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कामिल शकील शेख (वय २५, रा. कहार गल्ली, येवला) याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल २० हजार रुपये किंमतीचे हस्तगत केले.

ही अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे मस्तान उर्फ अरबाज शेख (रा. मोमीनपुरा, ता. येवला) यांनी विक्रीसाठी पुरविली होती, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली. दरम्यान, मस्तान उर्फ अरबाज शेख हा फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी, पोलीस उपनिरीक्षक दिनेश लोखंडे,पोलीस हवालदार श्रीकृष्ण बोडखे, सोपान शिंदे,पोलीस नाईक सतिष मोरे,पोलीस शिपाई जनार्धन दळवी,नवनाथ गायकवाड, दिपक मुंढे,चालक ओमकार तुंगार यांच्या पथकाने केली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!