ठाणे विशाल सावंत- मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठाणे महापालिका मुख्यालयात संध्याकाळी उशिरा धाड टाकल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतानाच ही कारवाई करण्यात आली.
अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या कार्यालयात ही धाड टाकण्यात आली. शंकर पाटोळे यांची चौकशी चार तासांहून अधिक काळ सुरू होती अभिराज डेव्हलपर्सचे अभिजित कदम यांच्याकडून घोडबंदर रोड परिसरातील बांधकामावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.
यापैकी पंधरा लाख रुपये रोख आणि दहा लाख रुपये एका अनोळखी व्यक्तीच्या खात्यात जमा करण्यात आले होते. काम न झाल्याने अभिजित कदम यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतरच ही कारवाई करण्यात आली आहे.
