लातूर सिटीलाईन न्यूज नेटवर्क अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयात कार्यरत असलेले अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा बालाजी आचार्य यांना अकोला जिल्हा कलावंत समिती आणि अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीच्या समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सर्वधर्म समभाव डॉ महाकवी वामनदादा कर्डक यांच्या १०३ वा जयंती महोत्सव सोहळ्यात राज्यस्तरीय डॉ महाकवी वामनदादा कर्डक पुरस्काराने रविवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी प्रमिलाताई ओक हॉल अकोला येथे उद्योजिका तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका सौ रिता पंकज खंडारे आणि मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. छाया रेखांकन प्रकाश कदम
या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय कलावंत न्याय समितीचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ गायकवाड, सामाजिक नेते श्रीकांत बनसोडे, प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवी गायक मनोजदादा गोसावी, उद्योजिका तथा संयोजक सौ. रिता पंकज खंडारे, प्रा गौतम पवार (नांदेड) प्रा किशोर वाघ, सविधान मनोहरे प्रकाशदीप वानखेडे, सचिन नागवंशी, निशा धोंगडे, दिपाली इंगळे आयोजक जिल्हाध्यक्ष पंकज खंडारे स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध गायिका रंजीताताई
जंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उद्घाटक श्रीकांत बनसोडे आणि मान्यवरांच्या शुभहस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलनाने विनम्र अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजक पंकज खंडारे यांनी मांडताना कवी गायक, कलावंताच्या न्याय हक्कासाठी समिती कार्यरत असून यावर्षी प्रा बालाजी आचार्य यांच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय बहुमूल्य अभूतपूर्व, प्रेरणादायी, प्रचंड आशादायी आणि प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यास मान्यवरांना सांगितले
यावेळी प्रा बालाजी आचार्य, श्रीकांत बनसोडे, प्रा गौतम पवार यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीकांत बनसोडे यांनी महाकवी वामनदादा यांच्या जयंती महोत्सवानिमित्त बोलताना बुद्ध फुले आंबेडकरवादी विचाराचा वारसा दादांनी आयुष्यभर जपून समाजासाठी आंबेडकरी चळवळ केली समाजाच्या उत्थानासाठी जगले असे मार्गदर्शन करून उद्घाटन झाल्याचे जाहीर केले त्यानंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक यांच्या भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज खंडारे, रिता खंडारे, सहअकोला जिल्हा कलावंत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
