कर्जतमध्ये अवैध गुटखा बाळगुन विक्री करणारे तिन आरोपी विरुद्ध आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Cityline Media
0
३,००,५६६ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

कर्जत प्नतिनिधी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती घेत कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरिक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे,ऱ्हदय घोडके,फुरकान शेख, शामसुदंर जाधव,प्रकाश मांडगे, मनोज साखरे, भाऊसाहेब काळे,अमोल आजबे,अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती घेत अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत पथकास सुचना  व मार्गदर्शन करुन नुकतेच पथक रवाना करण्यात आले होते.
हे पथक नुकतेच  कर्जत पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती घेत असतांना गुप्त खबऱ्या मार्फत भांडेवाडी परिसरामध्ये इसम नामे सचिन सोपान झगडे हा त्याचे राहते घरी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाला जवळ बाळगुन त्याची विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली.

या माहितीनुसार पथकाने तात्काळ सचिन झगडे याचे राहते घरी जावुन खात्री केली असता त्या ठिकाणी १) सचिन सोपान झगडे (वय ४२) रा.भांडेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर, २) स्वप्निल बबन सोनवणे वय २३ वर्षे, रा. लोणी मसदपुर, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर असे मिळुन आले. इसम नामे सचिन सोपान झगडे याचे घराची झडती घेता त्याचे कब्जामध्ये २,६८,५६६ रुपये किमतीचा आर.एम.डी.पानमसाला गुटखा, हिरा पान मसाला गुटखा,विमल पानमसाला गुटखा,डायरेक्टर स्पेशल पानमसाला गुटखा, सुगंधी तंबाखु व ३२,००० रुपये किमतीची होंडा कंपनीची ड्रिम युगा मोटारसायकल असा एकुण ३,००,५६६६६रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.

ताब्यातील इसमाकडे हा गुटखा कोणाकडुन आणला याबाबत विचारपुस करता त्यांनी सदरचा गुटखा हा ३) भाऊसाहेब किसन सकुंडे रा. मदनवाडी, भिगवन, ता. इंदापुर, जि. पुणे (फरार) याचेकडुन आणला असल्याचे कळविले आहे.

ताब्यातील इसमांना मुद्देमालासह कर्जत पोलीस ठाण्यात  हजर करण्यात आले असुन त्यांचेविरुध्द पोकॉ भाऊसाहेब राजु काळे नेम - स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन कर्जत पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३६/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ व २०११ चे कलम २६ (२) (प), २६(२), (पअ), २७ (३) (डी), २७ (३)(ई), ५९ (प) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास कर्जत पोलीस ठाण्यातील ‌पोलिस अधिकारी करीत आहे.

हि कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!