गाय ही आरोग्य देवता-डॉ.सुभाष ‌महाराज गेठे

Cityline Media
0


पुणे विशाल वाकचौरे विश्व हिंदू परिषद,विधी प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने आज पुणे व पिंपरी चिंचवड महानगरातील अधिवक्त्यांच्या उपस्थितीत वसुबारस / गोपाष्टमी व दिवाळी शुभेच्छा कार्यक्रम निमित्त गोपूजन या विषयावर डॅा सुभाष महाराज गेठे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री ॲड डॉ.सतिश गोरडे,ॲड सोहम यादव विधी प्रकोष्ठ - प्रांत सह संयोजक, ॲड संकेत राव, ॲड ऋषीकेश शर्मा,ॲड ऋतुराज आल्हाट आदि मान्यवर उपस्थित होते.

वेदांतचार्य डॅा सुभाष महाराज यांनी आपल्या प्रवचनात,गाय ही आरोग्य देवता असून दिवाळीची सुरुवात गोपूजनाने आपण करत असतो तेहतीस कोटी देवतांचे स्वरूप गोमाता आहे, लक्ष्मी स्वरूप अशी गोमाता परिपूर्ण आहे. गोमाता पासून पंचद्रव्य आपल्या आरोग्यासाठी उपयोगी ठरते त्यात गोमूत्र,दूध,दही,तूप, गोवर जर आपण रोजचे जीवनात वापरले तर आपले व कुटुंबाचे आरोग्य सुधारेल आपले आरोग्य सुधारले की राज्याचे आरोग्य सुधारेल,राज्याचे आरोग्य सुधारले की राष्ट्रीय आरोग्य उंचावेल.!त्यामुळे गोमातेस महाराष्ट्र राज्यात राजमाता हा दर्जा दिलेला आहे. त्याप्रमाणे दिवाळीचे महत्त्व आणि भारतीय संस्कृतीतील उत्सवांचे स्थान यावर सुंदर मार्गदर्शन केले. “तमसो मा ज्योतिर्गमय” या श्लोकाचा अर्थ स्पष्ट करून अंध:कारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
  
    कार्यक्रमाचे संयोजन ॲड आशिष गोरडे,ॲड भरत रणदिवे, ॲड सुशांत गोरडे,मेघा कांबळे यांनी केले.प्रास्ताविक प्रांत सह ॲड सतीश गोरडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन ॲड.सोहम यादव (प्रांत सह संयोजक,विधी प्रकोष्ठ) व सूत्रसंचालन ॲड संकेत राव यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!