महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला विमल पान मसाला गुटखा इको कारसह जप्त

Cityline Media
0


३,४६,८०० रुपये किमंतीचा मुददेमाल जप्त; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई
श्रीगोंदा प्रतिनिधी राज्यात गुटखा बंदी असताना देखील गुटखा कंपन्यांनी गृह विभागाला हाताशी धरून आपले उत्पादन सुरूच ठेवले आहे यातून कोट्यावधीच्या तडजोडी सुरू आहे.पोलीस मात्र संभ्रमात आहे अवैध गुटखा पकडल्यावर त्यांच्यावर जुजबी कारवाई करून त्यांना सोडले जातेय ही अनागोंदी कायद्याला छाती ठोक मांडी ठोक आव्हान देत आहे.

नुकतेच पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की,दौंड ते अहिल्यानगर जाणारे रोडवर इसम नामे अल्लाउददीन कासम सय्यूद (वय-29) वर्षे रा. सोनवाडी ता. दौंड जि.पुणे याने त्याचे ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची इको कार तिचा आर.टि.ओ. रजि.नं- एम एच ४३. ए १६६४ मध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला व शरीरास अपायकारक होईल असा खाद्य पदार्थ गुटखा खाण्यास अपायकारक आहे.

 हे माहित असताना देखील विमल पानमसाला (गुटखा) चोरुन विक्री करण्याचे उददेशाने वाहतुक करणेकरीता जाणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच पोलिस निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे शोध पथकामधील पोलिस नाईक/१२९९ संग्राम जाधव, पोना/ज्ञानदेव भागवत पोकों/संदिप शिरसाठ, पोकों/गणेश साने व पोकों/संदिप आजबे याना सदरची माहिती समजावून सांगितली.

लागलीच तुम्ही सदर ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे सांगीतले. त्यानंतर पोना / संग्राम जाधव यांनी लागलीच दोन पंचाना पोलीस ठाण्यास बोलाऊन घेऊन त्यांना नमुद हकीगत समजावून सांगून कारवाई करुन पंचनामा करणेकामी हजर रहा.

असे कळविलेने व पंचानी समंती दर्शविल्याने वरील पोलीस कर्मचारी व दोन खाजगी पंच असे नमुद ठिकाणी जावून दौंड ते अहिल्यानगर जाणारे महामार्गावर लोणी व्यंकनाथ गावचे शिवारात रेल्वे गेट नं-१२ चे जवळील रोडवर सापळा रचून बारा वा.चे सुमारास मारुती सुझुकी 

कंपनीची इको कार नं-एम एच४२.. एएल १६६३1 ही मधील चालकास इको कार बाजुला घेऊन थांबवून चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अल्लाउददीन कासम सय्यद (वय-२९ वर्षे रा. सोनवाडी ता. दौंड जि.पुणे असे असल्याचे सांगितले.

 असता त्यास सदर कारमध्ये काय आहे, असे विचारले असता त्याने गुटखा असल्याचे सांगितले.पोलिसांनी सोबत असलेल्या पंचासमक्ष कारची झडती घेतली असता सदर कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला व शरीरास अपायकारक होईल असा खादय पदार्थ गुटखा खाण्यास अपायकारक आहे

 हे माहित असताना ९६,८००रुपये विमला पानमसाला (गुटखा) व २,५०,०००-रुपये किमंतीची इको कार असा एकुण ३,४६,८००किमंतीचा मुददेमाल मिळून आला असून त्यास सदर गुटखा हा कोणाकडून खरेदी केला आहे, याबाबत विचारपुस केली असता त्याने हा

 गुटखा हा तौफीक तांबोळी (पुर्ण नाव माहीत नाही) रा. दौंड जि.पुणे यांचेकडुन खरेदी करून त्याची विक्री करण्याचे उददेशाने वाहतुक करुन कब्जात बाळगतांना मिळुन आला आहे, म्हणून सदर बाबत पोकॉ/२१८५ गणेश साने यांचे फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस ठाणे गु.रजि.नं-०९२३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३,२२३,२७४,२७५,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पो. उपनिरीक्षक संजय वाघमारे व पोकॉ शरद गावडे हे करीत आहे.

सदरची कारवाई ही जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे ,कर्जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रविण लोखंडे व पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोना/२२९९ संग्राम जाधव पोहेका/ज्ञानदेव भागवत, पोकॉ/संदिप शिरसाठ, पोकों/गणेश साने व पोकों/संदिप आजबे यांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!