दिनकर गायकवाड दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीच्या
मुसळधार पावसाने वडाळा गावातील गोपाळवाडी या लोकवस्तीमध्ये असलेल्या एका कच्च्या घराची भिंत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या अंगावर कोसळली.यामध्ये दिव्यांग वृद्ध दिलीप बारकू ठाकरे (७०) हे ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. त्यांच्या पत्नी विमलबाई ठाकरे (६५) या गंभीर जखमी झाल्या.
मागील अनेक वर्षापासून नगोपाळवाडी मध्ये हे गोरगरीब ठाकरे दाम्पत्य वास्तव्यास आहेत.याठिकाणी लहान विटांचे बांधकाम केलेल्या पत्र्याच्या एका घरात नेहमीप्रमाणे रविवारी रात्री दोघेही झोपी गेलेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे घराची एका बाजूची भिंत कोसळली.
रात्रीच्या वेळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे कोणाच्याही लक्षात आले नाही. सोमवारी भीक मागून उदरनिर्वाह करत असणारे ठाकरे दाम्पत्य हे एकमेकांसोबत वडाळा, इंदिरानगर भागात पायी फिरून भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होते.मागील पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते वडाळ्यातील तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या गोपाळवाडी लोकवस्तीत शेवटच्या कोपऱ्यात लहानशा पत्र्याच्या खोलीमध्ये राहत होते, असे नागरिकांनी सांगितले.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आजूबाजूला असलेल्या रहिवाशांनी धाव घेतली.सकाळी आठ वाजेच्या सुमारास रहिवाशांनी घटनेची माहिती इंदिरानगर पोलिसांना कळविली. पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रहिवाशांच्या मदतीने विमलबाई यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले.
