नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे दीपक पोटिंदे (वय ३२) या युवकाचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास मृत दीपक पोटिंदे मोहाडी शिवारात सुदाम मौले यांच्या शेतात नवीन लाईन ही जुन्या लाईनला जोडणाऱ्या डीपी स्ट्रक्चरचे काम करत असताना विजेचा धक्का लागला व त्याचा मृत्यू झाला.
महावितरणचे जोडारी आवारे यांनी लाईन बंद केल्याची शहानिशा न करतात दीपक पोटिंदे याला इलेक्ट्रिक पोलवर काम करण्यासाठी चढविले व त्याला कुठलेही हॅण्ड ग्लोव्हज, हेल्मेट, सुरक्षा बूट आदी विद्युत रोहक वस्तू न देता त्यास पोलवर चढविले.त्याचवेळी जबर शॉक लागून दीपक खाली पडला. त्यानंतर तत्काळ त्याला पिंपळगाव येथे खासगी रुग्णालयात नेण्यात आले; परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, नंतर त्याला पिंपळगाव ग्रामीण रुग्णालय नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनीदेखील त्याला मृत घोषित केले. यावेळी संतप्त नातेवाइकांकडून ठेकेदाराच्या चारचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली.
जोपर्यंत संबंधित ठेकेदार व लाईनमन यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेत दिंडोरी पोलीस
ठाण्यात ठिय्या मांडला होता. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात नि ठेकेदार अनिल निफाडे, लाईनमन क आवारे, सबस्टेशन मोहाडी व सहाय्यक अभियंता मोहाडी प यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर सायंकाळी मृत दीपक वर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संबंधित ठेके दाराकडे अल्पवयीन कामगार काम करीत असल्याचे देखील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मि मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे करत आहेत.
