संगमनेर प्नतिनिधी भौगोलिक दृष्ट्या डोंगराळ आणि निसर्ग रचनेत अतिशय दुर्गम व ग्रामीण असलेल्या अकोले तालुक्यातील लहित लिंगदेव येथील मुळ रहिवासी असलेले संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते संदेश आढाव यांचे चिरंजीव दर्शन संदेश आढाव यांची नुकतीच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात भारत सरकारच्या पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून दर्शन यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश अक्षरशःखेचून आणल्याने आनंद द्विगुणित होत आहे सामाजिक कार्यकर्ते संदेश आढाव यांचा जीवनप्रवास खुप खडतर होता वडील संदेश हे घरातील मोठे असल्या कारणाने त्यांनी तीन भावांची,आई-वडिलांची जबाबदारी घेत जेमतेम शिक्षण घेतले आणि मुंबईची वाट धरली.
मुंबईत मिळेल ते काम करून आई वडील भावांचा उदरनिर्वाह करून स्वतःच्या कुटुंबाचा ही पालन पोषण करण्याची मोठी जबाबदारी पार पाडली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मुलमंत्राचा सन्मान करुन त्यांनी आपल्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन मोठा मुलगा दर्शन यास इंजिनियर केले.
लहान मुलगा प्रसाद यांना आयटी सॉफ्टवेअरचे शिक्षण देऊन शिक्षण पूर्ण केले.त्यातही मुंबईचे काम सुटल्याने ते परत गावी येऊन हाताला मिळेल ते काम करत पुनश्च संघर्ष सुरू केला.पण लहित लिंगदेव सारख्या गावात कौलाघात खुप बदल झाला होता हाताला काम आहे पण योग्य दाम नाही त्यात प्रज्ञावंताची नगरी असलेल्या संगमनेरची वाट धरून मिळेल ते काम करून मुलांना शिकवण्याचा ध्यास घेतला दर्शन यांचे इंजिनिअरीग पुर्ण झाले पण त्यात त्यांचे मन रमेना त्यांनाही लोकसेवेची स्वप्न पडू लागली मग अतिशय तर्कशिल आणि चिकित्सक असलेल्या दर्शन यांनी आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भारत सरकारच्या पोलीस उपनिरीक्षक पद मिळविले आणि आपला विजय अक्षरश:खेचून आणला त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
