-प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठेकेदार कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा;
-अन्यथा शिवसेनेचा आंदोलनचा इशारा
संगमनेर नितीनचंद्र भालेराव नाशिक पुणे महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे.आळेफाटा ते संगमनेर दरम्यान आतापर्यंत विविध अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक न लावणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहतूक वळविणे,एकेरी वाहतूक इत्यादी अनेक कारणांमुळे मोठे अपघात वर्षभरात झाले आहे तसेच रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने होत आहे.याप्रकरणीजबाबदार सदर ठेकेदार कंपनी शंकर रामचंद्र कड इन्फ्रा प्रायव्हेट लि.यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्या बाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यास निवेदन दिले आहे.तसेच गुन्हा दाखल न केल्यास महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिवसेना (शिंदे) अनुसूचित सेलचे जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव यांनी संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले.तसेच पुणे नाशिक या महामार्गाचे सदर कंपनीकडे काम असुन ते काम निस्कृष्ट दर्जाचे करत आहे.काम चालु असताना या हायवे मध्ये २०२४ ते २५ या कालावधी मध्ये ३० व्यक्ती मयत झालेले असुन, या ठेकेदाराच्या विरोधामध्ये अनेक गावातील नागरीकांच्या तक्रारी घारगाव पोलिस ठाणे व घुलेवाडी पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
सदर व्यक्ती ठेकेदार अभिलाश रामचंद्र कड यांना सोमनाथ भालेराव यांनी फोन केला असता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची पारदर्शकता, कामाची गुणवत्ता,दर्जा खालावलेला आहे. दिशा फलक का? लावले नाही. विचारणा केली असता,त्यांना मला तुम्ही मला ब्लॅकमेल करत आहात!.अरेरावी करत,उर्मट भाषेत सामाजिक कार्यकर्ते यांना अपमानित केले.सदर ठेकेदार स्वताच्या मनमानीने रस्त्याचे निस्कृष्ट दर्जाचे काम करत आहे. सतत होणारी वाहतूक कोंडी यामुळे महामार्गाच्या आजुबाजुला असणारे शेतकरी, नागरिक त्रस्त झाले आहे.महामार्गासाठी दिलेले ॲम्बुलन्स अपघात झाल्यावर वेळेत उपलब्ध होत नाही.महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या अक्षम चुकीमुळे अपघातात विनाकारण बळी जात आहेत.
शंकर रामचंद्र कड इन्फ्रा प्रायव्हेट कंपनीवर गुन्हा दाखल न झाल्यास हिवरगांव पावसा टोल नाका येथे शिवसेना महायुतीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल या बाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक संगमनेर ग्रामीण पोलीस ठाणे घुलेवाडी यांना शिवसेनेचे अनुसूचित सेल जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव यांनी दिले.याप्रसंगी भाजपाचे गणेश दवंगे,केशव दवंगे, सोमनाथ दवंगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
