दाढ खुर्द प्रतिनिधी संगमनेर तालुक्यासह अहिल्यानगरतील संपूर्ण तालुक्यामध्ये लवकरच गाव तिथे शिवसेना अनुसूचित जाती विभागाची शाखा सुरू करण्यात आल्याची माहिती शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे यांनी दिले आहे.
विजयादशमीला शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा मुंबई येथे आयोजित केला होता या मेळाव्याला संगमनेर तालुक्यातून उत्तर आहिल्या नगर जिल्ह्यातून हजारो युवक मुंबईकडे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचाराने प्रेरित झाले आहे.
या मेळाव्यामध्ये युवक व ज्येष्ठ पदाधिकारी काँग्रेस व रिपब्लिकन पक्षातून मोठ्या संख्येने महाराष्ट्र राज्याचे पक्षप्रमुख शिवसेना पक्षाचे एकनाथ शिंदे अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.राजू वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला
दसरा मेळाव्यानंतर संगमनेर तालुक्यापासून शाखा उघडण्यामध्ये सुरुवात करणारा असून यामध्ये प्रामुख्याने पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचे विचार तळागाळातील गरीब माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम या शाखेच्या माध्यमातून शिवसेना अनुसूचित जाती विभागाचे पदाधिकारी करणारा आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गरीब माणसासाठी महिलावर्ग तरुण बेरोजगार शेतकरी यांच्यासाठी राबवलेला अनेक योजना शाखेच्या माध्यमातून गरीब माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम शाखेच्या माध्यमातून गावोगावी करणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे यांनी दिले आहे.
यावेळी पुढे बोलताना म्हणाले आहे की आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शासन आपल्या दारी कॅम्प पक्षाच्या वतीने घेऊन शासनाच्या जास्तीत जास्त योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसेना पक्षाच्या माध्यमातून करणारा असून शिवसेना पक्षाचे सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करणार आहे.
महायुती सरकारने अनुसूचित जाती बौद्ध मातंग चर्मकार समाजासाठी अनेक मोठा योजना महात्मा फुले मागास प्रवर्ग महामंडळ संत रोहिदास महामंडळ लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ आधी महामंडळाच्या मार्फत थेट कर्ज योजना बीज भांडवल योजना शैक्षणिक कर्ज लोन महिला समृद्धी योजना माहिती सरकारच्या काळामध्ये सुरू झाले.
या योजना ग्रामीण भागातील मागासवर्गीय माणसाच्या पर्यंत पोहोचून त्यांच्या उन्नतीसाठी योजना अमलात आणणार असल्याचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे यांनी म्हटले आहे जिल्ह्यामध्ये दसरा मेळाव्यानंतर शाखा उद्घाटनाचे कार्यक्रम व शासकीय शासन आपल्यादारी कॅम्पचे आयोजन करणार असल्याचे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे यांनी माहिती दिली आहे.
