पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नांना यश
झरेकाठी सोमनाथ डोळे २०२५ या वर्षात झालेल्या अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि पुरामुळे
संगमनेर तालुक्यातील शिबलापुर मंडळातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आता या बाधित शेतकऱ्यांसाठी याबाबत झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे महसूल विभाग व कृषी विभाग यांनी केली.
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी शिबलापुर मंडळातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी निधी मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले व मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,यांनी घोषणा केल्याप्रमाणे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळाली आहे प्राप्त निधीमुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा.यांचे शेतकरी ऋण व्यक्त करत आहे
