भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला करून घेतला चिमुकलीचा जीव

Cityline Media
0
जालना सिटीलाईन न्यूज नेटवर्क भटक्या कुत्र्यांनी एका तीन वर्षीय चिमुकलीचा जीव घेतला आहे. परी दीपक गोस्वामी असे मृत चिमुकलीच नाव आहे. जालना शहरातील अंबड चौफुली परिसरा ही घडली.
घटना मध्यरात्रीच्या सुमारास ही चिमुकली घराबाहेर पडली.तेव्हा भटक्या कुत्र्यांनी या चिमुकलीवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. दरम्यान चिमुकलीच्या अंगावर भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचं पोलिसांनी सांगितले.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार,ती चिमुकली परी तिच्या आईच्या शोधात घराबाहेर पडली होती.तीन वर्षीय परीवर त्यावेळी मोकाट कुत्र्यांनी हल्ला करीत तिचे लचके तोडल्याने तिचा मृत्यू झाला.पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोलार अभियंता असलेले दीपक गोस्वामी (बिहार) हे आपली पत्नी आणि दोन मुलींसह शहरातील यशवंत नगरात भाड्याने राहतात. पत्नीचा घरी दिवाळीनिमित्त गावी बिहारला जाण्याचा आग्रह होता. गोस्वामी यांनी पत्नीला रात्रीच्या सुमारास रेल्वेस्थानकात सोडले

चिमुकली परी आईसोबत न जाता वडिलांसोबत घरी परत आली. वडिलांसोबत झोपलेल्या परीला रात्रीच्या सुमारास आईची आठवण आली आणि मध्यरात्री ३:३० वाजण्याच्या सुमारास ती घराचं दार उघडून आईला शोधत घराच्या बाहेर पडली.

मोकाट कुत्र्यांनी एकट्या परीला पाहून तिचे लचके तोडले.घरी परतणारे पोलिस कर्मचारी मदन बहुरे यांच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी खबर दिली
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!