नाशिक दिनकर गायकवाड पायी जाणारे वृद्ध भरधाव कारच्या धडकेने जखमी झाल्याची घटना गंगापूर रोड येथे घडली.फिर्यादी गोविंद उद्धवराव श्रीनिवार (वय ७५, रा. अष्टविनायक पार्क, थत्तेनगर, नाशिक) हे आकाशवाणी जॉगिंग ट्रॅक येथे गेले होते.
वाघ गुरुजी चौक ते भाजी मंडई चौक येथून पायी जात होते.त्यावेळी प्रसाद सर्कलकडून आलेल्या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कारवरील चालक सुनील कळंबे याने फिर्यादी श्रीनिवार यांना धडक दिली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात दि.२८ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडला होता. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार लोंढे करीत आहेत.
