भारतातील सट्टा जाळे दुबईपर्यत!

Cityline Media
0
- ईडीच्या कारवाईने कर्नाटक हादरले!
- काँग्रेस आमदाराचा दोन हजार कोटींचा सट्टा घोटाळा उघड
- दुबईपर्यंत पोहोचले सट्ट्याचे जाळे!
-प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नाटक काँग्रेस आमदार वीरेंद्र पप्पी
- सट्टेबाजी प्रकरणातील दुसरा मुख्य चेहरा; समुंदर सिंह राठोड  
- महादेव ऑनलाइन बुक अ‍ॅपद्वारे सट्टेबाजीचे व्यवहार
- ईडीची १८ ठिकाणी कारवाई
- रोख, सोने, आणि परदेशी खात्यांची कागदपत्रे जप्त
- आंतरराष्ट्रीय मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कशी संबंध
- क्रिप्टो चलनांचा वापर करून पैसा वळवला

मुंबई विशाल सावंत कर्नाटकातील काँग्रेस आमदार वीरेंद्र पप्पी यांचे नाव तब्बल २,००० कोटी रुपयांच्या ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणात समोर आल्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ‌‘अंमलबजावणी संचालनालय‌’ (ईडी) च्या तपासातून या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.अंमलबजावणी संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, “महादेव ऑनलाइन बुक” या बेकायदेशीर सट्टेबाजी ॲपच्या माध्यमातून पैशांची अवैध देवाण घेवाण करण्यात आली.या व्यवहाराचा धागा दुबई श्रीलंका आणि सिंगापूर पर्यंत पोहोचला आहे.

ईडीने या प्रकरणात वीरेंद्र पप्पी यांना अटक केली असून त्यांच्या घरावर आणि कार्यालयांवर धाड टाकण्यात आली.या छाप्यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, सोन्याचे दागिने,आणि परदेशी बँक खात्यांची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. काँग्रेस आमदार वीरेंद्र ‌‘पप्पी‌’ यांच्या दोन हजार कोटींच्या ऑनलाईन सट्टेबाजी घोटाळ्यानंतर या प्रकरणातील दुसरा प्रमुख चेहरा समुंदर सिंह राठोड समोर आला आहे.

राजस्थानातील जोधपूर येथे राहणाऱ्या राठोडवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अलीकडेच मोठी कारवाई केली असून, या प्रकरणाला आता कॅसिनो आणि ऑनलाईन सट्टेबाजी जगाचे थेट आर्थिक जाळे असल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

या ॲपच्या माध्यमातून भारतातील हजारो वापरकर्ते दररोज सट्टा लावत होते.या रकमांचा प्रवाह कंपनीच्या बनावट बँक खात्यांद्वारे परदेशात वळवण्यात आला होता. तपासात समोर आले की या साखळीतील मुख्य व्यवहार २,००० कोटी रुपयांहून अधिक होता.

ईडीने म्हटले आहे की, “हा केवळ ऑनलाईन जुगार नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणारा मोठा घोटाळा आहे.” अनेक व्यवहार क्रिप्टो चलनांद्वारे (डिजिटल चलन) करण्यात आले होते,ज्यामुळे निधीचा मागोवा घेणे अवघड झाले. या प्रकरणातील चौकशीत कर्नाटकातील काही अधिकाऱ्यांचे आणि राजकीय व्यक्तींचे नावेही समोर येत आहेत.काँग्रेस पक्षाने या आरोपांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला असला, तरी विरोधकांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचार लपवण्याचा आरोप केला आहे.

केंद्रीय एजन्सीने आतापर्यंत १८ ठिकाणी छापे टाकले असून, १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता गोठवण्यात आली आहे. या प्रकरणातील काही संशयित व्यक्ती परदेशात पळाल्याचेही वृत्त आहे,आणि त्यांना ‌‘रेड कॉर्नर नोटीस‌’ जारी करण्याची तयारी सुरू आहे. ईडीच्या मते, वीरेंद्र पप्पी यांनी त्यांच्या निकटवर्तीयांच्या माध्यमातून बनावट कंपन्यांच्या नावाने पैशांचा व्यवहार केला. या कंपन्यांचा उपयोग परदेशात पैसा वळवण्यासाठी केला जात होता.

राज्यातील विरोधकांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “जनतेचे पैसे आणि तरुणांचे भविष्य सट्ट्याच्या नादात विकले जात आहे,” असा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे काँग्रेस नेत्यांनी यावर उत्तर दिले की, “कायद्याच्या चौकटीत तपास सुरू आहे, आणि दोषी कोण असेल त्याच्यावर कारवाई होईल.” या प्रकरणामुळे राज्य सरकारची प्रतिमा धोक्यात आली असून, आगामी स्थानिक निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

* चित्तरुड्र मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडून आलेले आमदार के.सी. विरेंद्र हे स्थानिक स्तरावर ‌‘पप्पी‌’ म्हणून ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी, बेकायदेशीर ऑनलाईन सट्टेबाजीचे ॲप्स चालवणाऱ्या टोळीविरुद्ध ‌‘ईडी‌’ने  तपास सुरू केला.
* तपासात अनेक किंग ५६७, लायन५६७, राजा ५६७ यांसारख्या वेबसाइट्सद्वारे देशभरातून पैसा जमा होत असल्याचे समोर आले. ‌‘ईडी‌’च्या तपासानुसार, या ॲप्सच्या व्यवहारांचा एकूण उलाढाल जवळपास २,०० कोटींवर पोहोचली,आणि याच नेटवर्कमध्ये आमदार वीरेंद्र यांचा थेट सहभाग असल्याचे ठोस पुरावे मिळाले.
* या व्यवहारांमधून आलेला पैसा विविध ‌‘म्यूल अकाऊंट्स‌’, पेमेंट गेटवे, आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून पुढे फिरवण्यात आला.
====
छाप्यात काय काय?
२२ ते २३ ऑगस्ट २०२५ रोजी ‌‘ईडी‌’ने वीरेंद्र पप्पी यांच्या मालकीच्या आणि संबंधित असलेल्या ३१ ठिकाणांवर छापे टाकले बेंगळुरू,चित्तरुड्र,मुंबई, गोवा हबली,जॉधपूर आणि सिक्किमपर्यंत या छापेमारीचा विस्तार होता.
‌‘ईडी‌’ला मिळालेले संपत्तीचे तपशील:
१२ कोटी रोख रक्कम
४ किलो सोने आणि १० किलो चांदी
६ लक्झरी कार्स व्हीआयपी नंबर्ससह
“०००३ सीरिजच्या गाड्या
९ बँक खात्यांतील ४०.६९ कोटी आणि १ डिमॅट अकाऊंट मधील निधी फ्रीझ
२६२ म्यूल अकाऊंट्स मधून १४.४६ कोटी थेट गोठवण्यात आले.एकूण जप्त व गोठविण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत आजवर १५० कोटींपेक्षा अधिक असल्याचे ‌‘ईडी‌’ने स्पष्ट केले आहे.
अलीकडच्या छापेमाऱ्यात ‌‘ईडी‌’ने ४० किलो सोनं हस्तगत केले.

अटक आणि न्यायालयीन प्रक्रिया
छापेमारी नंतर २३ ऑगस्ट २०२५ रोजी वीरेंद्र पप्पी यांना गंगटोक (सिक्किम) येथे ‌‘ईडी‌’ने अटक केली. त्यांना प्रथम ईडी कोठडी देण्यात आली, त्यानंतर न्यायालयाने त्यांची ४ दिवसांनी वाढवली. पुढे ८ सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.
‌‘ईडी‌’ने न्यायालयास सांगितले की, वीरेंद्र यांच्या नातेवाईकांमध्ये आणि जवळच्या सहकाऱ्यांमध्ये अनेकांनी म्यूल अकाऊंट्स वापरले आहेत. त्यांच्या भाच्याचा, पृथ्वी एन राज अलियस अप्पू याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, वीरेंद्र यांच्या पत्नी आरडी चैतरा यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करून,अटक आणि ईसीआयआर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी दावा केला की, ही कारवाई ‌‘राजकीय दबावाखाली करण्यात आली आहे.

काँग्रेस सरकार अडचणीत 
संपूर्ण प्रकरणाने कर्नाटकातील काँग्रेस सरकारला अडचणीत आणले आहे. विरोधकांचा आरोप आहे की, “राज्याचे सत्ताधारीच काळ्या पैशांच्या खेळात सामील आहेत.” दुसरीकडे काँग्रेसने या प्रकरणाला “राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई” म्हणून संबोधले आहे. राजकीय पातळीवर, वीरेंद्र पप्पी यांचा प्रभाव मोठा असल्याने, त्यांच्या अटकेनंतर पक्षांतर्गतही मतभेद निर्माण झाले आहेत. राज्य मंत्र्यांकडून “कायदा आपले काम करेल” अशी भूमिका मांडण्यात आली असली तरी, पक्षाच्या आतली अस्वस्थता स्पष्ट जाणवते. काँग्रेस आमदार वीरेंद्र पप्पी यांच्या अटकेमुळे कर्नाटकात निर्माण झालेल्या राजकीय हलचाली आणि ‌‘ईडी‌’च्या आर्थिक चौकशीचा पुढील टप्पा या प्रकरणाचा खरा परीघ ठरवणार आहे.

आंतरराष्ट्रीय आणि ‌‘कॅसिनो कनेक्शन‌’
तपासातून समोर आलेली सर्वात मोठी बाब म्हणजे या नेटवर्कचे परदेशी संबंध. ‌‘ईडी‌’च्या माहितीनुसार, वीरेंद्र यांचे गोव्यातील आणि परदेशातील कॅसिनो व्यवसायांशी संबंध आहेत. पप्पूस् कॅसिनो प्राइड बिग डॅडी कॅसिनो ओक्कन ७ ० कॅसिनो, कॅसीनो अशा ठिकाणांवरून बेटिंगच्या पैशांचे व्यवहार होत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
तसेच श्रीलंका, नेपाळ आणि जॉर्जिया या देशांमध्ये काही ऑनलाइन गेमिंग आणि कॅसिनो व्यवहारांचे पुरावे तपासात समोर आले आहेत.मार्टिन नावाच्या गुंतवणूकदाराशी वीरेंद्र यांचे व्यवहार झाले असल्याचा उल्लेख ‌‘ईडी‌’च्या कागदपत्रांमध्ये आहे. मार्टिन हा स्वतः अनेक प्रकरणांत संशयित आहे. या बेटिंग व्यवहारांमधून मिळालेला पैसा लक्झरी प्रवास, व्हिसा खर्च, व सर्व्हर व्यवस्थापन, आणि विदेशी तांत्रिक सेवांसाठी वापरला गेल्याचा आरोप आहे.

कॅसिनो व्यवहार आणि सट्ट्याच्या पैशाचा संबंध
समुंदर सिंह राठोड हा गोव्यातील ‌‘मेजेस्टिक प्राईड‌’ कॅसिनोचा आर्थिक भागीदार असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या कॅसिनो मधून मिळणारा निधी आणि ऑनलाईन सट्टेबाजी ॲप्समधून फिरणारे पैसे हे एकाच नेटवर्कद्वारे फिरत होते, असा संशय ‌‘ईडी‌’ला आहे. राठोडच्या विविध कंपन्यांच्या नावाने बनावट खात्यांद्वारे निधी परदेशात वळवला गेला, असे प्राथमिक निष्कर्ष तपासात समोर आले आहेत. या साखळीचा काही भाग दुबई, श्रीलंका आणि सिंगापूर येथील आर्थिक व्यवहारांशी निगडित असल्याची शक्यता तपासली जात आहे.

वीरेंद्र पप्पी आणि राठोड यांचा आर्थिक दुवा
या प्रकरणातील काँग्रेस आमदार वीरेंद्र पप्पी आणि समुंदर सिंह राठोड यांच्यातील आर्थिक संबंधांचे पुरावे‌‘ईडी‌’कडे असल्याचे वृत्त आहे. पप्पी यांच्याद्वारे चालविल्या जाणाऱ्या सट्टेबाजी नेटवर्क मधील काही व्यवहार थेट राठोडच्या खात्यांशी जोडलेले असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमधील व्यवहार हेक्रिप्टो चलन, बनावट आयटी कंपन्या आणि ‌‘फ्रंट अकाऊंट्स‌’यांच्या माध्यमातून केले जात होते. ‌‘ईडी‌’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “हे नेटवर्क केवळ भारतापुरते मर्यादित नव्हते; त्याचे धागे परदेशी बँक खात्यांपर्यंत पोहोचले आहेत.”

धाडीत १० हून अधिक मालमत्ता आणि व्यावसायिक फ्लॅट्स जप्त
जोधपूर मधील छापेमारीत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख, सुमारे ४ किलो सोने आणि चांदी, तसेच कॅसिनोतील गुंतवणुकीची नोंदी सापडल्या आहेत. याशिवाय, राठोड यांच्या नावावर १० हून अधिक मालमत्ता आणि व्यावसायिक फ्लॅट्स असल्याचे आढळले आहे. 
ईडीने या मालमत्तांची सविस्तर चौकशी सुरू केली असून,काही स्थावर मालमत्ता गोठविण्यात आल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!