श्रीरामपूर दिपक कदम तालुक्यातील हरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील धोकादायक लोखंडी जिना बदलून नवीन सिमेंटचा जिना बसवण्यात यावा तसेच पुतळ्याजवळील चौथाऱ्याचे रुंदीकरण करण्यात यावे,या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवक दिपक धुमने यांना निवेदन देण्यात आले. मागणी पूर्ण न केल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदन प्रसंगी बोलताना सुभाष त्रिभुवन म्हणाले की, "हरेगाव ही भूमी भीम अनुयायींसाठी ऊर्जा भूमी आहे तिथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ डिसेंबर १९३९ रोजी महार वतन परिषद घेतली होती. या ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी हरेगाव येथे अहिल्यानगर जिल्ह्यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारक जवळ दरवर्षी हजारो भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात.
मात्र, सध्या तिथे जी लोखंडी सीडी १९८३ साली बसवलेली आहे,ती खूपच धोकादायक व जिर्ण आहे. त्याचबरोबर पुतळ्याजवळ उभे राहण्यासाठी चौथार्याची जागा खूपच अरुंद आहे."पुढे बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला की, "महामानवाला अभिवादन करताना जीव मुठीत धरून चढ-उतार करावा लागतो, ही बाब अत्यंत खेदजनक संताप आणणारी आहे.
ग्रामपंचायतीने या ठिकाणी तत्काळ सिमेंटचा जिना बसवावा आणि जागेचे रुंदीकरण १६ डिसेंबर पूर्वी करण्यात यावे.अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ग्रामपंचायतीला टाळे ठोकले जाईल."म्हणून
प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी मा.सरपंच दिलीप त्रिभुवन रमेश भालेराव अशोक बोधक किशोर अभंग निलेश भालेराव आदित्य पंडित आशिष भालेराव गौरव शिरसाठ करण शिरसाट रोहन शरणागते आकाश पठारे विशाल धोत्रे किरण बावस्कर निलेश शिंदे संजय चव्हाण विशाल गायकवाड आदी उपस्थित होते.
